PM Narendra Modi : काँग्रेसच्या राजवटीत ४६ दहशतवादी हल्ले शेकडो नागरिक ठार, मोदींच्या राजवटीत २० हल्ले नागरिक सुरक्षित

२२ मे २००४ पासून काँग्रेसप्रणित पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार होते जे २०१४ पर्यंत राहिले. या कालखंडात ४६ दहशवादी आणि नक्षलवादी हल्ले झाले. त्यात १ हजार ४५४ नागरिक ठार झाले आहेत.

205
narendra modi
काँग्रेसच्या १० वर्षांच्या राजवटीत ४६ दहशतवादी हल्ले शेकडो नागरिक ठार, मोदींच्या राजवटीत २० हल्ले नागरिक सुरक्षित

एप्रिल २०२३ मध्ये दोन हल्ले झाले, त्यापैकी २० एप्रिल रोजी काश्मिरातील पूंछ येथे भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला केला, त्यामध्ये ४ जवान हुतात्मा झाले. त्यानंतर २६ एप्रिल रोजी छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला, त्यात ११ जवान ठार झाले. या दोन हल्ल्यामुळे मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. मात्र हे हल्ले तब्बल २ वर्षांनी झाले आहेत.

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून ९ वर्षांच्या नरेंद्र मोदींच्या कालखंडात २० हल्ले झाले आहेत, त्यातील सगळे हल्ले सुरक्षारक्षकांवर झाले आहेत, त्यामध्ये २१३ जवान हुतात्मा झाले आहेत, मात्र या हल्ल्यात अवघा २० नागरिक ठार झाले आहेत. यातील बहुतांश हल्ले देशाच्या नागरिकांवर करण्याची हिंमत दहशतवाद्यांची झाली नाही, हे हल्ले झाले तेव्हा जरी जवान ठार झाले, तरी त्याच वेळी हल्ले करणारे दहशतवादी आणि नक्षलवादी यांनाही जवानांनी ठार केले आहे. याउलट २२ मे २००४ पासून काँग्रेसप्रणित पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार होते जे २०१४ पर्यंत राहिले. या कालखंडात ४६ दहशवादी आणि नक्षलवादी हल्ले झाले. त्यात १ हजार ४५४ नागरिक ठार झाले आहेत. हे हल्ले राजरोसपणे देशातील विविध शहरांमध्ये नागरीवस्त्या आणि सार्वजनिक ठिकाणी करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची जीवित हानी मोठी झाली. असे असले तरी मोदी सरकारच्या काळात सुरक्षारकांवर हल्ले होणे हे भूषणावह नाही.

(हेही वाचा Chhattisgarh Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुरूंग स्फोटात ११ जवान हुतात्मा)

२००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेसच्या राजवटीतील हल्ले 

  • १५ ऑगस्ट २००४ – आसाममध्ये हल्ला – १८ नागरिक ठार, ४० जखमी
  • २ ऑक्टोबर २००४ – नागालँड येथे बॉम्बहल्ला – ३० नागरिक ठार, १०० जखमी
  • ५ जुलै २००५ – अयोध्यावर हल्ला – १ नागरिक ठार
  • २८ जुलै २००५ – जैनपूर ट्रेनवर बॉम्ब हल्ला – १३ प्रवासी ठार
  • २९ ऑक्टोबर २००५ – दिल्लीत बॉम्बस्फोट – ६३ नागरिक ठार, २७० जखमी
  • २८ सप्टेंबर २००५ – बंगळुरूमध्ये बॉम्बस्फोट – १ नागरिक ठार
  • ९ फेब्रुवारी २००६ – अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट – १ नागरिक ठार, १५ जखमी
  • ७ मार्च २००६ – वाराणसी येथे बॉम्बस्फोट – २८ नागरिक ठार, १०१ जखमी
  • ११ जुलै २००६ – मुंबई लोकल बॉम्बस्फोट मालिका – २०९ ठार, ७१४ जखमी
  • ८ सप्टेंबर २००६ – मालेगाव येथे बॉम्बस्फोट – ४० ठार, १२५ जखमी
  • १८ फेब्रुवारी २००७ – समझौता एक्सप्रेसवर बॉम्बहल्ला – १७ ठार, ५० जखमी
  • १८ मे २००७ – हैद्राबाद येथे बॉम्बस्फोट – १७ ठार, १०० जखमी
  • २५ ऑगस्ट २००७ – हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट – ४२ ठार, ५४ जखमी
  • ११ ऑक्टोबर २००७ – राजस्थान येथे बॉम्बहल्ला – ३ ठार, १७ जखमी
  • १४ ऑक्टोबर २००७ – पंजाबमध्ये बॉम्बस्फोट – ६ ठार
  • २४ नोव्हेंबर २००७ – लखनऊमध्ये बॉम्बस्फोट – १६ ठार, ७० जखमी
  • १ जानेवारी २००८ – रामपूर येथे नक्षल हल्ला – ८ ठार, ५ जखमी
  • १३ मे २००८ – जयपूर येथे बॉम्बस्फोट – ७१ ठार, २०० जखमी
  • २५ जुलै २००८ – बंगळूर येथे बॉम्बस्फोट – १ ठार, २० जखमी
  • २६ जुलै २००८ – गुजरातमध्ये बॉम्बस्फोट – ५६ ठार, २०० जखमी
  • १३ सप्टेंबर २००८ – दिल्लीत बॉम्बस्फोट – ३३ ठार, १२० जखमी
  • २७ सप्टेंबर २००८ – दिल्लीत बॉम्बस्फोट – ३ ठार, २१ जखमी
  • २९ सप्टेंबर २००८ – मालेगाव येथे बॉम्बस्फोट – १० ठार, ८० जखमी
  • १ ऑक्टोबर २००८ – अगरतला येथे बॉम्बस्फोट – ४ ठार, १०० जखमी
  • २१ ऑक्टोबर २००८ – इंफाळ येथे बॉम्बस्फोट – १७ ठार, ४० जखमी
  • ३० ऑक्टोबर २००८ – आसाम येथे बॉम्बस्फोट – ८१ ठार, ४७० जखमी
  • २६ नोव्हेंबर २००८ – मुंबई हल्ला – १७१ ठार, ३०० जखमी
  • १ जानेवारी २००९ – गुवाहाटी बॉम्बस्फोट – ६ ठार, ६७ जखमी
  • ६ एप्रिल २००९ – आसाम बॉम्बस्फोट – ९ ठार, ६३ जखमी
  • १३ फेब्रुवारी २०१० – पुणे येथे बॉम्बस्फोट – १७ ठार, ५४ जखमी
  • १० फेब्रुवारी २०१० – प. बंगाल बॉम्बस्फोट – २८ ठार
  • ६ एप्रिल २०१० – दंतेवाडा येथे नक्षल हल्ला – ७६ जवान ठार
  • १७ मे २०१० – दंतेवाडा नक्षल हल्ला – ३३ जवान ठार
  • २८ मे २०१० – प. बंगाल येथे बॉम्बस्फोट – १४८ ठार, २०० जखमी
  • ७ डिसेंबर २०१० – वाराणसी येथे बॉम्बस्फोट – २ ठार ३७ जखमी
  • १३ जुलै २०११ – मुंबई बॉम्बस्फोट मालिका – २६ ठार, १३० जखमी
  • २१ फेब्रुवारी २०१३ – हैद्राबाद बॉम्बस्फोट – १८ ठार, १३१ जखमी
  • १३ मार्च २०१३ – काश्मीर येथे बॉम्बस्फोट – ७ ठार, १० जखमी
  • २५ मे २०१३ – छत्तीसगड नक्षल हल्ला – ३२ ठार
  • २४ जून २०१३ – काश्मीर येथे बॉम्ब हल्ला – ८ ठार, १९ जखमी
  • २७ ऑक्टोबर २०१३ – बिहारमध्ये बॉम्ब हल्ला – ६ ठार, ८५ जखमी
  • २६ डिसेंबर २०१३ – प. बंगाल बॉम्ब हल्ला – ५ ठार
  • ११ मार्च २०१४ – छत्तीसगड नक्षल हल्ला – १६ ठार
  • २५ एप्रिल २०१४ – झारखंड बॉम्ब हल्ला – ८ ठार
  • १ मे २०१४ – आसाम दंगल – ३३ ठार
  • २३ डिसेंबर २०१४ – आसाम दंगल – ८५ ठार
  • १२ मे २०१४ – झारखंड बॉम्ब हल्ला – ७ ठार

(हेही पहा

(हेही वाचा परमवीर चक्र सन्मानित जवानांना ‘परमवीर शौर्य, प्रणाम’)

२६ मे २०१४ ते २६ एप्रिल २०२३ पर्यंत पंतप्रधान मोदींच्या राजवटीतील हल्ले

  • २० मार्च २०१५- जम्मू दहशतवादी हल्ला – ३ जवान ठार, २ दहशतवादी ठार
  • ४जून २०१५ – मणिपूर येथे दहशतवादी हल्ला – १८ जवान ठार
  • २७ जुलै २०१५ – पंजाब पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला – ४ पोलीस ठार
  • २ जानेवारी २०१६ – पठाणकोट येथे दहशतवादी हल्ला – ७ जवान ठार, ४ दहशतवादी ठार
  • २५ जून २०१६ – जम्मू येथे दहशतवादी हल्ला – १० जवान ठार
  • १८ सप्टेंबर २०१६ – उरी येथे दहशतवादी हल्ला – १९ जवान ठार
  • ३ ऑक्टोबर २०१६ – बारामुल्ला येथे दहशतवादी हल्ला – ३ जवान ठार, २ दहशतवादी ठार
  • २९ नोव्हेंबर २०१६ – काश्मीर येथे दहशतवादी हल्ला – ७ जवान ठार, ३ दहशतवादी ठार
  • २४ एप्रिल २०१७ – सुकमा येथे नक्षल हल्ला – २५ पोलीस ठार
  • १० फेब्रुवारी २०१८ – जम्मूत दहशतवादी हल्ला – ६ जवान ठार, ३ दहशतवादी ठार
  • १३ मार्च २०१८ – सुकमा येथे नक्षल हल्ला – ९ जवान ठार
  • १४ फेब्रुवारी २०१९ – पुलवामा येथे दहशतवादी हल्ला – ४० जवान ठार
  • ९ एप्रिल २०१९ – दंतेवाडा येथे नक्षल हल्ला – ४ जवान ठार
  • ९ एप्रिल २०१९ – गडचिरोली नक्षल हल्ला – १५ पोलीस ठार
  • १ मे २०१९ – गडचिरोली येथे नक्षल हल्ला – १५ पोलीस ठार
  • १२ जुलै २०१९ – काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला – ४ जवान ठार
  • ३ एप्रिल २०२१ – सुकमा येथे नक्षल हल्ला – २२ जवान ठार, ९ नक्षलवादी ठार
  • २० एप्रिल २०२३ – पुंछ येथे दहशतवादी हल्ला – ४ जवान ठार
  • २६ एप्रिल २०२३ – छत्तीसगड नक्षलवादी हल्ला – ११ जवान ठार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.