पहलगाममधील पाक पुरस्कृत हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला असा धडा शिकवला आहे की, ज्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. दहशतवाद्यांची ९ ठिकाणी उद्ध्वस्त केल्यानंतर जगभरातून भारताला पाठिंबा मिळत आहे. पाकिस्तानवर निमूटपणे सहन करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) यांनी पाकिस्तानी जनतेला धादांत खोटी माहिती दिली आहे. त्यांनी भारताने हल्ला करण्यासाठी पाठवलेल्या राफेल विमानांपैकी ५ विमाने पडल्याचा दावा केला आहे. पण या विमानांचा एक तुकडाही दाखवला नाही.
(हेही वाचा Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये उद्ध्वस्त केलेली ‘ही’ ९ ठिकाणे होती आतंकवाद्यांची लाँचपॅड)
पंतप्रधान शहाबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) यांनी म्हटले की, भारताने ८० राफेल विमानांसह पाकिस्तानवर हल्ला केला, मात्र आम्ही त्यातील ५ विमाने पाडली, असा दावा त्यांनी केला आहे. हा दावा धादांत खोटा ठरला आहे. कारण त्यांनी याचा एकही पुरावा दिला नाही. हे पुरावे देण्याची वेळ येऊ नये म्हणून शरीफ यांनी ही विमाने समुद्रात पडल्याचे सांगत बालिश वक्तव्य केले. याउलट भारतानेच पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान भारताच्या हद्दीत पाडले आहे. याचे व्हिडीओ समोर आले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) हे पाकिस्तानी जनतेचे मनोबल राखण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती देऊ लागले आहेत. ज्याच्यामुळे पाकिस्तान स्वतःच स्वतःचे हसे करून घेत आहे.
चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनही शहाबाज शरीफ यांनी जो दावा केला, त्यावर पुष्टी दिली. त्यावर भारताच्या चीनमधील दुतावासाने याचे तातडीने खंडन केले आहे.
(1/n) Dear @globaltimesnews , we would recommend you verify your facts and cross-examine your sources before pushing out this kind of dis-information. https://t.co/xMvN6hmrhe
— India in China (@EOIBeijing) May 7, 2025
दहशतवाद्यांना पुरण्यासाठी आयएसआय, पाकिस्तानचे पोलिस होते सहभागी
ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या जनाजाला (पुरण्यासाठी) आयएसआय आणि पाकिस्तानचे पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी दहशतवादी याकूब मुघलच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसत आहेत. मुघल मुझफ्फराबादमधील बिलाल दहशतवादी प्रशिक्षण शिबिराचे नेतृत्व करत होता. सीमापार दहशतवादासाठी ओळखले जाणारे हे शिबिर भारताने हल्ला केलेल्या नऊ ठिकाणांपैकी एक होते.
Join Our WhatsApp Community