Indian Army : मंदिर, गुरुद्वारामध्ये जाण्यास ख्रिश्चन अधिकाऱ्याचा नकार; सैन्याने दिला नारळ

150

भारतीय सैन्यातील ख्रिश्चन कमांडिंग अधिकारी सॅम्युअल कमलेसन यांची सेवा पुन्हा सुरू केली जाणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने अधिकाऱ्याच्या सेवेची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कमांडिंग अधिकाऱ्याचे काम उदाहरण घालून देणे आहे, विभाजन करणे नाही. (Indian Army)

सॅम्युअल कमलेसन यांनी पेन्शन आणि ग्रॅच्युइटीशिवाय सेवेतून बडतर्फ करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच, त्यांची सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) बडतर्फीचा आदेश कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Nashik : बडतर्फ जवानाकडून सैन्य दलाची बदनामी; गुन्हा दाखल)

न्यायमूर्ती नवीन चावला आणि न्यायमूर्ती शलिंदर कौर यांच्या खंडपीठाने अधिकाऱ्याच्या याचिकेवर सुनावणी केली. खंडपीठाने याचिका फारीज करताना सांगितले की, सशस्त्र दलांमधील (Armed Forces) रेजिमेंटची नावे अनेकदा धर्म किंवा क्षेत्राशी संबंधित असतात, परंतु यामुळे लष्कराच्या धर्मनिरपेक्षतेवर (Secularism) आणि या रेजिमेंटमध्ये तैनात असलेल्या सैनिकांच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होत नाही.

पुढे म्हटले, “आमच्या सशस्त्र दलांमध्ये सर्व धर्म, जाती, पंथ, प्रदेश आणि विश्वासाचे कर्मचारी आहेत, ज्यांचे एकमेव उद्दीष्ट देशाला बाह्य आक्रमणांपासून वाचवणे आहे आणि म्हणूनच ते त्यांच्या धर्म, जात किंवा प्रदेशाने विभाजित न होता त्यांच्या गणवेशाने एकत्र आहेत.”

न्यायालयाने अधिकाऱ्याला फटकारले आणि म्हटले, “कमांडिंग अधिकाऱ्याचे काम विभाजन नाही, तर उदाहरण घालून देणे असते. युनिटमधील धार्मिक गतिविधींना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः जेव्हा ते सैनिकांची कमान सांभाळतात, ज्यांचे ते युद्धस्थिती आणि युद्धात नेतृत्व करतील.”

धार्मिक परेडमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता

सॅम्युअल कमलेसन यांची मार्च 2017 मध्ये भारतीय लष्कराच्या 3 कॅव्हलरी रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या युनिटमध्ये शीख, जाट आणि राजपूत सैनिकांचे 3 स्क्वॉड्रन समाविष्ट असतात. त्यांना स्क्वॉड्रन बी चा ट्रूप लीडर बनवण्यात आले होते, ज्यात बहुतेक शीख जवान होते. कमलेसन यांनी सांगितले की, त्यांच्या रेजिमेंटमध्ये केवळ मंदिर आणि गुरुद्वारामध्ये धार्मिक परेड होते. परिसरात कोणतेही सर्वधर्मस्थळ नाही आणि त्यांच्या श्रद्धेनुसार कोणतेही चर्च नाही.

कमलेसन यांचे म्हणणे होते की, त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापासून सूट मागितली होती. यावर दुसऱ्या बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, रेजिमेंटमध्ये सामील झाल्यापासूनच अधिकारी परेडमध्ये सहभागी होत नव्हते. त्यांना कमांडंट आणि इतर अधिकाऱ्यांनीही समजावले, परंतु त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.

न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला की, कमलेसन यांना समजावूनही त्यांचे वर्तन सुधारले नाही. त्यांचे आचरण लष्कराच्या शिस्तीला आणि रेजिमेंटच्या नियमांनुसार नव्हते. जेव्हा सर्व पर्याय संपले होते, तेव्हा त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. (Indian Army)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.