चीनचा ‘स्पाय बलून’ अमेरिकेने फोडला! F22 फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा

156

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या आकाशात दिसणाऱ्या चीनच्या स्पाय बलूनवर अमेरिकेने कारवाई केली आहे. चीनचा स्पाय बलून अमेरिकेने फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा करत फोडला आहे. हवामानसंबंधित माहिती गोळा करण्यासाठी या स्पाय बलूनचा वापर करण्यात येत असल्याचे चीनने सांगितले होते. परंतु हा चीनचा हेरगिरीचा डाव असल्याचे अनेकांचे मत होते.

( हेही वाचा : वंदे भारतमध्ये निकृष्ट जेवण; ट्विटरवर व्हिडिओ व्हायरल, IRCTC कडून चौकशीचे आदेश )

पेंटागॉनचा दावा 

दरम्यान अमेरिकेने चीनचा स्पाय बलून फोडून अनेकांना झटका दिला आहे. जो बायडन प्रशासनाने कॅरोलिना किनाऱ्याजवळ हा बलून पाडला. F22 या लढाऊ विमानातून डागलेल्या क्षेपणास्त्राने हा स्पाय बलून फोडण्यात आला. चीन या बलूनद्वारे हेरगिरी करत होता असा दावा पेंटागॉनने केला होता, पेंटागॉन अमेरिकेच्या सैन्य दलाचे मुख्यालय आहे.

स्पाय बलूनचे अवशेष हटवण्याचे काम सुरू 

गेल्या काही दिवसांपासून या स्पाय बलूनवर अमेरिकेची करडी नजर होती. चिनी स्पाय बसून पहिल्यांदा अमेरिकेतील अणुऊर्जा प्रकल्पावर उडताना दिसला. यानंतर लॅटिन अमेरिकेत दृष्टिस पडला या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत असल्याचा दावा पेंटागॉनने केला होता. अखेर अमेरिकेच्या हवाई दलातील लढाऊ विमानांनी ही स्पाय बलून फोडला आहे. या बलूनचे अवशेष हटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.