China : रशियन गुप्तचर दस्तऐवजात चीनचा ‘शत्रू’ (China) असा उल्लेख करण्यात आला आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस(एफएसबी)च्या लीक झालेल्या दस्तऐवजात चीनला शत्रू(China) असे संबोधले गेले आहे. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या बातमीने जगभरात एकच खळबळ माजल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, रशिया चीनकडून एक मोठा गुप्तचर धोका असल्याची भीती या दस्तऐवजातून व्यक्त करण्यात येत आहे. (China)
(हेही वाचा ‘पाकिस्तानात दहशतवादी जितके आत असतील तितके आत घुसू’; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा )
दरम्यान, रशियन एफएसबीच्या दस्तऐवजाती अहवालात चीनला रशियन शास्त्रज्ञांची भरती करायची असून या माध्यमातून लष्करी कारवायांवरही हेरगिरी करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. चीनच्या कुरापतीबाबत एफएसबीने रशियाला थेट इशाराच दिला आहे. विशेष म्हणजे या लीक झालेल्या दस्तऐवजातून रशियाची भीती उघडकीस आली आहे.
रशियाच्या गुप्तचर यंत्रणा असलेल्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस(एफएसबी)कडून लीक झालेल्या दस्तऐवजातून चीनबद्दल वाढता अविश्वास दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ‘द न्यू यॉर्क टाईम्स’ने मिळविलेल्या ०८ पानांच्या नियोजन दस्तऐवजात एजन्सीने चीनला ‘शत्रू'(China) असे संबोधले आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या, एफएसबी युनिटने लिहिलेल्या या दस्तऐवजात चीनकडून रशियन राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर व वाढता धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.(China)
युक्रेन व आर्क्टिकवर हेरगिरी एफएसबीचा दावा
चीनी एजंट युक्रेनमध्ये रशियन लष्करी कारवायांवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत. त्यांचे उद्दिष्ट पाश्चात्य-पुरवठ्यातील शस्त्रांचे विश्लेषण करणे व आधुनिक युद्ध तंत्रे शिकणे आहे, असा दावा रशियन गुप्तचर यंत्रणेच्या दस्तऐवजानुसार दिसून येत आहे. तसेच, चीनी गुप्तचर संस्था रशियन खाण कंपन्या आणि विद्यापीठ संशोधन केंद्रांचा वापर करून आर्क्टिकमध्ये हेरगिरी करतात, असा आरोप एफएसबीच्या अहवालात करण्यात आला आहे.(China)
Join Our WhatsApp Community