Ceasefire : शस्त्रसंधीला तिलांजली देणाऱ्या पाकिस्तानला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

Ceasefire :  नूर अली खान एअरबेस नष्ट करून भारताने स्पष्ट संदेश दिल्यानंतरही पाकिस्तानला पुन्हा हल्ले सुरूच ठेवले आहेत. शस्त्रसंधी(Ceasefire) कराराचं उल्लंघन केले असून भारताकडून त्यास जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

89

Ceasefire :  नूर अली खान एअरबेस नष्ट करून भारताने स्पष्ट संदेश दिल्यानंतरही पाकिस्तानला पुन्हा हल्ले सुरूच ठेवले आहेत. शस्त्रसंधी(Ceasefire) कराराचं उल्लंघन केले असून भारताकडून त्यास जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. याआधीच भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर देऊन एअरफोर्स वन सुरक्षा, सर्वोच्च लष्कर प्रमुखांना स्पष्ट इशारा दिला असतानाही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. आता रफिकी, मुरीद, चकलाला, सुकून, चुनिया विमानतळावर हल्ला करून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

जम्मूमधील आप शंभू मंदिर आणि माता वैष्णो देवी या हिंदूंच्या पवित्र स्थळांवरही पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर म्हणून, भारताने १० मे रोजी सकाळी मोठे हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर शस्त्रसंधी करारानंतरही पाकिस्तानने हल्ले सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा Operation Sindoor : ८६ तासांच्या ‘युद्धात’ कोणकोणत्या घडल्या घडामोडी? भारताने काय मिळवले? जाणून घ्या… )

पहलगाममध्ये नागरिकांवर आणि हिंदू धर्मावर झालेल्या हल्ल्यानंतर, पाकिस्तान स्वतःला अडचणीत आणत असल्याचे दिसून येत आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. यामध्ये, भारतीय हवाई दलाने अचूक हवाई हल्ल्यांद्वारे पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारखे ०९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले आणि भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. पण भारताने हे हल्ले हाणून पाडले.

९ ते १० मे च्या रात्री पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. यामध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला या महत्त्वाच्या भागांना लक्ष्य करण्यात आले होते. पाकिस्तानने दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त देखील आले होते, जे हरियाणातील सिरसा येथे भारतीय सुरक्षा दलांनी रोखल्याचं पाहायला मिळाले.

पाकिस्तानने जम्मूमधील आप शंभू मंदिर आणि माता वैष्णोदेवी यांसारख्या हिंदूंच्या पवित्र स्थळांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर म्हणून, भारताने १० मे रोजी सकाळी मोठे हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानने दावा फेल ठरून त्यांची लष्करी मालमत्ता सुरक्षित नसून प्रतिमांमध्ये मोठे स्फोट आणि मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.