अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवार, सायंकाळी ५.३३ वाजता ट्विट करून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी (Ceasefire) तयार झाले आहेत, असे ट्विट केले आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रांत मिसरी यांनी भारतानेही शस्त्रसंधी (Ceasefire) जाहीर केली. शुक्रवार सायंकाळी ५ वाजल्यापासून भारताने तिन्ही दलाच्या सर्व कारवाया थांबवल्याचे जाहीर केले आहे. 12 मे पर्यंत भारताने शस्त्रसंधी स्वीकारली आहे, असे मिसरी म्हणाले. मात्र तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च स्तरीय बैठक घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामध्ये यापुढे दहशतवाद म्हणजे युद्ध समजले जाईल, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात भारताने दहशतवाद कृत्याला कदापि सहन करणार नाही, असा सज्जड दिला आहे.
परराष्ट्र सचिव विक्रांत मिसरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अमेरिकेने दोन्ही देशांशी चर्चा केली. त्यानंतर पाकिस्तानने सर्वात आधी सफेद झेंडा फडकावून शस्त्रसंधीची (Ceasefire) घोषणा केली. त्यानंतर भारताने शस्त्रसंधीची घोषणा केली, असे सांगितले. पण काही तासांच्या आधी भारताने महत्वाचा निर्णय जाहीर केला. यापुढे भारत दहशतवादी कृत्याला भारत यापुढे युद्ध म्हणून पाहिलं. भारताच्या या निर्णयामुळे भारताने तूर्तास युद्ध थांबवले आहे, पण पाकिस्तानने यापुढे एक जरी दहशतवादी कृत्य केले तर मात्र थेट युद्ध पुकारू, असे अप्रत्यक्षपणे भारताने जगाला सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community