Ceasefire : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर ड्रोन हल्ले करण्यात असून कच्छ, जम्मू भागात दिसून आले. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना परतवून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जम्मूत फायरिंग सुरु केली असून जम्मू-काश्मीर पंजाब राजस्नानात ड्रोन्स दिसल्याचे वृत्त आहे.
(हेही वाचा Ceasefire : युध्दविरामानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… )
दरम्यान, शस्त्रसंधी करारावर तीन तासांपूर्वीच शिक्कामोर्तब झालं असताना पाकिस्तानकडून अवघ्या काही तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघनCeasefire करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसांतला सर्वात मोठा ड्रोन हल्ला हा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या बाजून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून श्रीनगरात ५०हून अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू बाडनेरमध्ये एका मागोमाग एक ड्रोन्स दिसून आले आहेत. श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, कच्छ परिसरात १० ड्रोन दिसल्याची माहितीदेखील समोर आली आहे. संपूर्ण श्रीनगर परिसरात ड्रोन हल्ल्याचे आवाज आल्याची माहिती समोर आली आहे.Ceasefire
Join Our WhatsApp Community