काही तासांपूर्वीच भारत-पाकिस्तान यांच्यात युध्दविरामा(Ceasefire)ची घोषणा केली होती. त्याच्या अवघ्या ३ तासांनंतर पुन्हा पाकिस्ताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून आरएस पुरा, एलओसी, अखनूर, चंब आणि भिमबेर या ठिकाणी जोरदार फायरिंग करण्यात येत असून याला बीएसएफनेदेखील सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तसेच, याठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले असून भारतीय सैन्यदलाकडून चोख उत्तर देण्यात येत आहे.
(हेही वाचा Ceasefire : भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानला बसला मोठा दणका; संरक्षण दलाच्या पत्रकार परिषदेतून खोटारडेपणा उघड )
भारत-पाकिस्तान तणावाला अखेर पूर्णविराम मिळाला असून दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी(Ceasefire) लागू करण्यात आली. सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू केल्याची भारत सरकारने घोषणा केली असून येत्या १२ मेला दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच भारतीय सैन्यदलांची पत्रकार परिषद घेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली होती. पण त्यानंतर आता पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं ट्विट
जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी देखील शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत ट्विट केले आहे. युद्धबंदीचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले!!! अशा आशयाचं ट्विट मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमुळे पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले असून भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community