Manipur मध्ये BSF जवानांचे वाहन दरीत कोसळले : 3 हुतात्मा, तर 13 जण जखमी

128
Manipur मध्ये BSF जवानांचे वाहन दरीत कोसळले : 3 हुतात्मा, तर 13 जण जखमी
Manipur मध्ये BSF जवानांचे वाहन दरीत कोसळले : 3 हुतात्मा, तर 13 जण जखमी

मणिपूरमधील (Manipur) सेनापती जिल्ह्यात बीएसएफ (BSF) जवानांना घेऊन जाणारे एक वाहन दरीत कोसळले. या अपघातात तीन सैनिक हुतात्मा झाले, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. इम्फाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Imphal-Dimapur National Highway) चांगौबुंग गावाजवळ सायंकाळी ४ वाजता हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिकांना घेऊन जाणारे वाहन ओव्हरलोड होते. (Manipur)

हेही वाचा-नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार ; मंत्री Atul Save यांची माहिती

सर्व सैनिक एकाच बटालियनचे आहेत आणि नागालँडमधील झाडिमा येथे तैनात आहेत. मणिपूरमधील परिस्थिती बिघडल्यानंतर त्यांना राज्यात तैनात करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवान त्यांच्या QRT ड्युटीनंतर कांगपोकपीहून IIIT, मायांगखांग येथील त्यांच्या बेस कॅम्पला परतत होते. (Manipur)

हेही वाचा-PM Narendra Modi मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय !

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, BSF च्या दोन जवान जागीच हुतात्मा झाले, तर एका जवानाने रुग्णालयात नेत असताना अखेरचा श्वास घेतला. हुतात्मा जवानांचे शव सेनापती जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. जखमी जवानांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. (Manipur)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.