BSF : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवादी पुन्हा घुसखोरीच्या तयारीत आहेत. घुसखोरीची भीती व्यक्त करतानाच सीमा सुरक्षा दल(BSF) हाय अलर्टवर असल्याची माहिती बीएसएफ पोलीस महानिरीक्षक शशांक आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असून पाकिस्तानवर कुठलाच भरवसा ठेवता येणार नाही. बीएसएफ(BSF)ने आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करताना कुठलीच कसर सोडलेली नाही, असेही पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.(BSF)
ऑपरेशन सिंदूरबाबत पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस महानिरीक्षक म्हणाले, भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशनच्या माध्यमातून शत्रूच मनसुबे हाणून पाडले आहेत. सैन्याच्या कारवाईत पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. सीमेपलीकडून संभाव्य दहशतवादी कारवायांच्या शक्यतेने भारतीय सीमेवर दक्षता वाढविण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
(हेही वाचा “…तर परिस्थिती आणखी वाईट होईल”; Shashi Tharoor यांचा पाकिस्तानला कडक इशारा )
पोलीस महानिरीक्षकांनी सीमारेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नांची भीती व्यक्त करतानाच बीएसएफ(BSF) हाय अलर्टवर आहे. सुरक्षा दल सतर्कता कमी पडू देऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सीमेपलीकडून गोळीबार किंवा घुसखोरीची योजना आखली जाऊ शकते अशी माहिती मिळाली असून त्याच पार्श्वभूमीवर आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आणि सतर्क आहोत, असे पोलीस महानिरीक्षक शशांक आनंद म्हणाले.
पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार नाही – पोलीस महानिरीक्षक शशांक आनंद
आयजी शशांक आनंद म्हणाले, पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार नाही म्हणूनच ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ(BSF) पूर्णपणे तयार आणि सतर्क आहे असे सांगतानाच असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांच्यासह बीएसएफ(BSF) महिला कर्मचाऱ्यांनी पुढच्या चौक्यांवर तैनात राहून अनुकरणीय धैर्य दाखविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच, सांबा सेक्टरमधील एका चौकीला ऑपरेशन सिंदूर आणि इतर दोन चौक्यांना शहीदांच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव आहे, असेही ते म्हणाले.(BSF)
Join Our WhatsApp Community