Bangladeshi Infiltrator : ‘ऑपरेशन पुशबॅक’ अंतर्गत घुसखोऱ्यांविरोधातील कारवाईला वेग; दिल्लीत नेमकी काय परिस्थिती?

Bangladeshi Infiltrator : 'ऑपरेशन पुशबॅक' अंतर्गत देशातील अवैध बांग्लादेशीं(Bangladeshi Infiltrator)ना मायदेशी धाडण्यात येत आहे. भारतात अवैध बांगलादेशीं(Bangladeshi Infiltrator)ची ओळख पटवून त्यांना अटक करून मायदेशात पाठविण्यात येत आहे.

113

Bangladeshi Infiltrator : ‘ऑपरेशन पुशबॅक’ अंतर्गत देशातील अवैध बांग्लादेशीं(Bangladeshi Infiltrator)ना मायदेशी धाडण्यात येत आहे. भारतात अवैध बांगलादेशीं(Bangladeshi Infiltrator)ची ओळख पटवून त्यांना अटक करून मायदेशात पाठविण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीत मोठी कारवाई केली आहे. एकट्या दिल्लीत आतापर्यंत असंख्य अवैध बांग्लादेशीं(Bangladeshi Infiltrator)ना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या पथकाने शहरांतील १४ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली असून १३४ बांग्लादेशी घुसखोरांना मायदेशात पाठविण्यात आले आहे.(Bangladeshi Infiltrator)

 

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईत ३८ महिला व ४३ मुलांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांचं पथक शहरातील झोपडपट्ट्या व संशयास्पद भागात कारवाई करत आहे. बांगलादेशी घुसखोऱ्यां(Bangladeshi Infiltrator)ची ओळख पटविण्याकरिता येथील नागरिकांचे मतदार ओळखपत्र व आधार कार्ड तपासली जात आहेत. पोलिसांनी दक्षिण दिल्लीत मोठी कारवाई करत गेल्या पाच महिन्यांत १३४ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

(हेही वाचा कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी पुन्हा ओकली गरळ; म्हणाले, Operation Sindoor हे लहान मुलांच्या… )

‘ऑपरेशन पुश बॅक’ अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात दक्षिण जिल्हा पोलीस उपायुक्तांनी माहिती दिली. ते म्हणाले, ऑपरेशनद्वारे करण्यात आलेली कारवाई एका मोठ्या रणनीतीचा भाग असून यातून शहरातील अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच, या मोहिमेद्वारे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र व इतर कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे.

आतापर्यंत दाखल झालेले गुन्हे व अटक

या कारवाई दरम्यान, भारतीय दंड संहिता, परदेशी नागरिक कायदा, शस्त्र कायदा व आधार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगम विहार, फतेहपूर बेरी, लोधी कॉलनी आणि मैदानगढी सारख्या परिसरातील पोलिसांकडून ही अटक करण्यात आली आहे.

संगम विहारमध्ये ०५ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली तर फतेहपूर बेरीमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. लोधी कॉलनीमध्ये एका प्रकरणात दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मैदानगढीमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला बेकायदेशीर शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे.(Bangladeshi Infiltrator)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.