भारत-पाकिस्तान संघर्षात स्वतंत्र Balochistanच्या मागणीला जोर घेताना दिसत आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. त्यांनी भारताला विनंती केली आहे की, तुम्ही आम्हाला राष्ट्र म्हणून मान्यता द्या, असे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर म्हटले आहे. बलुचिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, Balochistanमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू असून बलुचिस्तानच्या विविध गटांकडून तेथील चीनी नागरिक, पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करून ठार करत आहेत. परंतु, बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास यायचे असेल तर काही भागावर नियंत्रण आणावे लागेल. पण या गोष्टीला वेळ लागेल, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरच होईल; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा पुनरुच्चार )
ते पुढे म्हणाले, दरवर्षी ३५० ते ४०० पाकिस्तानी सैन्य मारले जात असून पाकिस्तानच्या अर्धसैनिक दले, पोलिसांवरही मोठे हल्ले होताना दिसून येत आहेत. बलुचिस्तानच्या रस्त्यावरून जाताना पाकिस्तानी सैन्य घाबरत असून चीन-पाकिस्तान कॉरिडॉर वापरत कठीण होऊन बसले आहे. बलुचिस्तानला लागून असलेले गवादर बंदरावर जहाजसुध्दा येत नसून याचा मोठा फटका चीन, पाकिस्तानला बसला आहे. किंबहुना, बलुचिस्तानच्या जाळ्यात पाकिस्तान, बलुचिस्तान मोठ्या प्रमाणावर फसल्याचेही निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर सांगितले.
सोशल मीडियावर पाहायला मिळाला #Republic of Balochistan ट्रेंड
Balochistan प्रजासत्ताकच्या स्वातंत्र्याची घोषणा करतानाचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत असताना आता #RepublicofBalochistan असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. दरम्यान, बलुचिस्तानचे नागरिक दीर्घकाळापासून स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानपासून स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे.
बलुच हक्कांचे समर्थक मीर यार बलोच यांनी ‘एक्स’वर अनेक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली. भारत सरकारला नवी दिल्लीत बलुच दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंतीदेखील केल्याचे समोर आले. तसेच, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला या प्रदेशातून माघार घेण्यास सांगितले. दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ आला असल्याने लवकरच एक संभाव्य घोषणा केली पाहिजे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले असून आम्ही भारताला बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दिल्लीतील दूतावास सुरू करण्याची विनंती करतो,” असे दि. ०९ मे रोजी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले.Balochistan
Join Our WhatsApp Community