
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचं (Baluchistan Attack On Pakistan Army) पाणी बंद करून त्यांच्या आर्थिक नाड्याही आवळल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानची तडफड सुरू आहे. पाकिस्तानने भारतालाही धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. एकीकडे भारताला मोठ्या मोठ्या धमक्या देणारा पाकिस्तान आज त्यांच्याच देशातील अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने हादरून गेला आहे. (Baluchistan Attack On Pakistan Army)
Zabardast News 🚨
बलोचिस्तान लिब्रेशन आर्मी ने पाकिस्तानी सेना के काफिले पर बोला हमला, हमले में 20 से ज़्यादा पाकिस्तानी सैनिकों की मौत..
यही नहीं…..अभी और सुनो
बलूचिस्तान आर्मी ने बाकायदा
इसका वीडियो बनाया और जारी किया 🔥 pic.twitter.com/6HtGi965br— Deepak Sharma (@SonOfBharat7) April 25, 2025
बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) क्वेटा येथील मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला आहे. यात पाकिस्तानचे २० सैनिक ठार झाले आहेत. बीएलएच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला रिमोट कंट्रोल इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस म्हणजे आयईडीने करण्यात आला आहे. यात पाकिस्तानी सैन्याच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. (Baluchistan Attack On Pakistan Army)
क्वेटा परिसर गेल्या काही वर्षापासून बलूच बंडखोरांच्या कारवायांचं केंद्र राहिला आहे. बीएलएने केलेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, या हल्ल्यात २० पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाल्याचं वृत्त आहे. बलूच लिबरेशन आर्मी गेल्या अनेक वर्षापासून बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. त्यासाठी या फोर्सकडून शस्त्र उठाव केला जात आहे. (Baluchistan Attack On Pakistan Army)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community