ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून उडवून दिले. यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान, लष्कर प्रमुख Asim Munir यांना बंकरमध्ये हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख Asim Munir ला भारताच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी बंकरमध्ये हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या बेधडक कारवाईच्या धसक्याने लष्करप्रमुख असीम मुनीरची पळता भूई थोडी झाली. असीम मुनीरला रावळपिंडीतील जनरल मुख्यालय संकुलातील एका मजबूत बंकरमध्ये पाकिस्तानी लष्कराला हलवावे लागले. दरम्यान, दि. ०९ आणि १० मेच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचं कंबरडं मोडलं. भारताच्या हवाई हल्ल्यात सरगोधा एअरबेस नेस्तानाबूत करण्यात आले. त्याचबरोबर, बहावलपूर, मुरीदकेसारख्या दहशतवादी तळांना भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात बेचिराख करण्यात आले.
पाकिस्तानने लक्ष्य केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या वर्षावाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने अनेक हवाई तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले. ज्यात रावळपिंडीतील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाजवळील नूर अली खान हवाई तळाचा समावेश होता. विशेष म्हणजे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानापर्यंत भारताच्या हल्ल्याची तीव्रता पोहोचल्याची माहितीदेखील समोर आली.Asim Munir
Join Our WhatsApp Community