Army Agniveer Vacancy 2025 : भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय सैन्य अग्निवीर भरती २०२५ साठी (Army Agniveer Vacancy 2025) अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन अर्ज १२ मार्च २०२५ पासून सुरू झाले असून, इच्छुक उमेदवार १० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. (Army Agniveer Vacancy 2025)
या भरतीअंतर्गत (Army Agniveer Vacancy 2025), अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर, अग्निवीर ट्रेड्समन, सैनिक टेक्निकल नर्सिंग यासह विविध पदांवर (Army Bharti) भरती केली जाईल. भरतीची लेखी परीक्षा जून २०२५ (Army Agniveer Vacancy 2025) मध्ये घेतली जाईल, तथापि नेमकी तारीख जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन माहीती घेऊ शकतात.
(हेही वाचा – CM Medical Assistant Medical Fund ची दमदार कामगिरी; एकाच दिवशी १७१ रुग्णांना १ कोटींहून अधिक अर्थसहाय्य)
अशी असेल ‘अर्ज फी’
या भरतीसाठी सर्व श्रेणीतील (जनरल, ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस) उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. जे फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाईल.
‘ही’ आहेत आवश्यक कागदपत्रे
अर्जासाठी १०वी आणि १२वीच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, स्कॅन केलेली स्वाक्षरी, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) आवश्यक असेल. तसेच अग्निवीर जनरल ड्यूटी (GD) पदांसाठी, उमेदवाराने ४५% गुणांसह १० वी आणि १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराकडे हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना असेल तर त्याला चालक पदासाठी प्राधान्य दिले जाईल. अग्निवीर तांत्रिक पदांसाठी, ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी हे अनिवार्य विषय असले पाहिजेत. (Army Agniveer Vacancy 2025)
(हेही वाचा – अभियांत्रिकी विषयाच्या परीक्षा आता मराठीतून; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती)
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भारतीय सैन्याच्या अधिकृत www.joinindianarmy.nic.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. भारतीय सैन्यात (Indian Army) निवड किंवा भरतीसाठी कोणत्याही एजंट किंवा संस्थेची निवड करण्यात आलेली नसून, उमेदवारांनी भरती एजंट म्हणून काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊ नयेत. असे आवाहन भारतीय सैन्य (Agniveer online application?) मार्फत करण्यात आले आहे. (Army Agniveer Vacancy 2025)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community