पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना भारताला अमेरिके(America)कडून मोठी मदत मिळणार आहे. अमेरिकेचं संरक्षण विभाग भारताला लष्करी साहित्य पुरविणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान उभय देशांत युध्दजन्य परिस्थिती उद्भवली असताना अमेरिकेने(America) मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेच्या(America) संरक्षण मंत्रालयाची प्रमुख संस्था डीएससीएने लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट देण्यात मान्यता दिली आहे.
दरम्यान, दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांतर्गत १३१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ११.०८ अब्ज रुपये किमतीचे महत्त्वाचे लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट पुरवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिके(America)च्या संरक्षण विभागाने दिलेल्या मंजुरीनंतर भारताला इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रात जागरूकता वाढविण्यास मदत होईल. त्याचबरोबर अमेरिके(America)ने लष्करी उपकरणांसह पुरवठ्यासंदर्भात ‘सी-व्हिजन सॉफ्टवेअर’, ‘रिमोट सॉफ्टवेअर’ आणि ‘विश्लेषण सहाय्य’ खरेदी करण्याबद्दलही चर्चा झाली होती.
भारत आणि अमेरिका(America) यांच्यात लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी वेळोवेळी संरक्षण करार याआधी करण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकन(America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. ट्रम्प म्हणाले होते की, मी भारत आणि पाकिस्तान दोघांच्याही खूप जवळ असून काश्मीर प्रश्नावरून उभय देशांत बरीच वर्षे संघर्ष सुरू आहे. या हल्ल्याचा निषेध करत ट्रम्प यांनी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातील बड्या राष्ट्रांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.(America)
Join Our WhatsApp Community