Air Strike In Iraq : इराकमध्ये अमेरिकेकडून एअर स्ट्राईक, १६ नागरिकांचा मृत्यू, २५पेक्षा जास्त जण जखमी

169
Air Strike In Iraq : इराकमध्ये अमेरिकेकडून एअर स्ट्राईक, १६ नागरिकांचा मृत्यू, २५पेक्षा जास्त जण जखमी
Air Strike In Iraq : इराकमध्ये अमेरिकेकडून एअर स्ट्राईक, १६ नागरिकांचा मृत्यू, २५पेक्षा जास्त जण जखमी

इराकमध्ये इराण समर्थित (Air Strike In Iraq) ठिकाणांवर अमेरिकेने एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जखमी झालेत. या घटनेची माहिती पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांच्या कार्यालयाने दिली.

इराकने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, या क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी युतीची उपस्थिती “इराकची सुरक्षा, स्थिरता तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये इराकचा सहभाग धोक्यात आणते. अमेरिकेच्या अनेक विमानांनी आकाशातून बॉम्बगोळे फेकले. जिथे आमचे सुरक्षा जवान तैनात होते तिथेही हल्ला झाला. त्यासोबत आसपास नागरी रहिवासी ठिकाणेही होती. या आक्रमक हल्ल्यामुळे १६ नागरिकांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी आहेत. या हल्ल्यामुळे इमारती आणि नागरिकांच्या संपत्तीचेही नुकसान झाले आहे.

(हेही वाचा – Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेसाठी महापालिकेचा क्लबशी असा समझौता )

इराकमधील सुरक्षा आणि स्थिरता धोक्यात
अमेरिकेने जाणूनबुजून हा हल्ला केला असून इराकच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय असल्याचं सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. या हवाई हल्ल्यामुळे इराकमधील सुरक्षा परिस्थिती रसातळाला जाईल आणि त्यामुळे आवश्यक स्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना बाधा पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी ज्यांनी आपल्या नियुक्त केलेल्या कामांपासून विचलित केले आहे आणि दिलेला जनादेश इराकमधील सुरक्षा आणि स्थिरता धोक्यात आणण्याचे कारण बनले आहे. यामुळे इराक प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघर्षात आहे, असे इराकने सांगितले आहे. इराक सरकार आमच्या देशातील जमीन, शहरे आणि सैन्यात काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.