Ahmedabad Plane Crash : हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ ; शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या

138
Ahmedabad Plane Crash : हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ ; शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या
Ahmedabad Plane Crash : हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ ; शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या

गुजरातच्या अहमादाबाद (Ahmedabad Plane Crash) येथे गुरुवारी (12 जून) एअर इंडियाचे विमान बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयावर कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ झाला. यावेळी वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. (Ahmedabad Plane Crash)

एअर इंडियाचे विमान हॉस्टेलवर कोसळल्यामुळे 15 ते 20 शिकाऊ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य किंवा आकडा जारी करण्यात आलेला नाही. परंतु, अपघातानंतर इमारतीला आग लागल्यामुळे जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून खाली उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Ahmedabad Plane Crash)

यासंदर्भात एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाने जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या माळ्याहून खाली उडी मारली. यात त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. अजूनपर्यंत मुलाला भेटता आले नसून त्याच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे त्याच्या आईने स्पष्ट केले. (Ahmedabad Plane Crash)

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाचा काही भाग हॉस्टेलच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला धडकला. यात इमारतीचे भीषण नुकसान झाले असून इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. (Ahmedabad Plane Crash)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.