पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारतावर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यात सायबर सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सायबर सेलने अनेक ऑनलाईन हल्ले नोंदविले असून पाकिस्तानसह अन्य देशांतील हॅकिंग गटांनी भारतीय प्रणालीवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, २२ एप्रिलला करण्यात आलेल्या पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांनी आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारतीय प्रणालीवर होणाऱ्या सायबर हल्ल्यात कमालीची वाढ झाली असून त्याचे प्रमाण १० लाखांहून अधिक असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात आले आहे. सायबर विभागाने सांगितले की, भारतीय वेबसाईट, पोर्टल यांना लक्ष्य करण्यात आले असून पाकिस्तान, मध्य पूर्व, इंडोनेशिया आणि मोरोक्को येथून झाले आहेत.
विशेष म्हणजे हॅकिंग करणाऱ्या विविध गटांनी स्वतःला इस्लामिक गटाशी आपला संबंध असल्याचे बोलले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव असताना या सायबर हल्ल्याने नोडल कार्यालयाकडून संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, सायबर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनादेखील सायबर विभागाल दिली आहे. नोडल कार्यालय म्हणाले की, हे सायबर युद्ध असू शकते. महाराष्ट्र सायबर विभागाने यातील अनेक हल्ले हाणून पाडले आहेत. नोडल कार्यालयाने सर्व सरकारी विभागांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. याद्वारे विभागांना त्यांचे सायबर पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community