छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ७ Naxalites ठार, २०२५ मध्ये बस्तरमध्ये १८० हून जणांचा खात्मा

इंद्रवती राष्ट्रीय उद्यानात ही नक्षलविरोधी (Naxalites) कारवाई करण्यात आली आहे.

61
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी (Naxalites) ठार झाले आहेत. त्यापैकी शनिवारी (७ जून २०२५) ५ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये २ महिलांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू होती. यापूर्वी २ कमांडरचे मृतदेहही सापडले होते.
इंद्रवती राष्ट्रीय उद्यानात ही नक्षलविरोधी (Naxalites) कारवाई करण्यात आली आहे. ही चकमक डीआरजी आणि सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनने केली आहे. ही नक्षलविरोधी (Naxalites) कारवाई ५ जून २०२५ पासून सुरू आहे. ज्या ठिकाणी ही चकमक झाली ती जागा घनदाट जंगलांचा परिसर आहे. बस्तर रेंजमध्ये २०२५ मध्ये आतापर्यंत १८६ माओवादी ठार झाले आहेत. २०२४ ते २०२५ दरम्यान, नक्षलविरोधी सततच्या प्रयत्नांमुळे या प्रदेशात ४०३ हून अधिक माओवादी मारले गेले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.