Pahalgam Terror Attack मधील दहशतवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर; पोलिसांनी लावले पोस्टर्स

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे 4 ते 5 जिहादी दहशतवादी घटनेच्या एक महिना आधीपासून सक्रीय होते.

70

पहलगाम येथील नरसंहारातील 3 दहशतवाद्यांवर पोलिसांनी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पहलगाम येथे 3 जिहादी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी लश्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या (टीआरएफ) दहशतवाद्यांनी निरपराध हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार केले होते. (Pahalgam Terror Attack)

(हेही वाचा – India-Pakistan War : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणतात, १३ लाख भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत)

यामध्ये आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा या दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हल्ला चढवून सुमारे 100 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. परंतु, पहलगाम हल्ल्याला 20 दिवस उलटूनही या दहशतवाद्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस ठीक-ठिकाणी छापेमारी करीत आहे.

जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे 4 ते 5 जिहादी दहशतवादी घटनेच्या एक महिना आधीपासून सक्रीय होते. दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने पहलगामची रेकी देखील केली होती. त्यामुळे बक्षीस जाहीर केल्यानंतर स्थानिकांकडून या दहशतवाद्यांची माहिती मिळू शकलेत या अपेक्षेने पोलिसांनी या दहशतवाद्यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स जारी केले आहेत. (Pahalgam Terror Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.