Pakistan Spy Jasbir Singh च्या फोनमध्ये सापडले 150 पाकिस्तानी नंबर ; लाहोरमध्ये ज्योतीसोबत खरेदी … Video Viral

Pakistan Spy Jasbir Singh च्या फोनमध्ये सापडले 150 पाकिस्तानी नंबर ; लाहोरमध्ये ज्योतीसोबत खरेदी ... Video Viral

87
Pakistan Spy Jasbir Singh च्या फोनमध्ये सापडले 150 पाकिस्तानी नंबर ; लाहोरमध्ये ज्योतीसोबत खरेदी ... Video Viral
Pakistan Spy Jasbir Singh च्या फोनमध्ये सापडले 150 पाकिस्तानी नंबर ; लाहोरमध्ये ज्योतीसोबत खरेदी ... Video Viral

ज्योती मल्होत्राच्या (Pakistan Spy Jasbir Singh) अटकेनंतर एक फोटो समोर आला. ज्यामध्ये जसबीर सिंग (Pakistan Spy Jasbir Singh) ज्योतीसोबत दिसत आहेत. या व्हिडिओनंतर तो सुरक्षा एजन्सींच्या रडारवर आला. यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये, जसबीर सिंग पाकिस्तानमध्ये ज्योती मल्होत्रासोबत खरेदी करताना दिसत आहे. जसबीर (४१) हा रोपार जिल्ह्यातील महालन गावचा रहिवासी आहे. (Pakistan Spy Jasbir Singh)

कुटुंब गावातून पसार
जसबीरला (Pakistan Spy Jasbir Singh) अटक केल्यानंतर त्याचे कुटुंब गावातून गायब झाले आहे. चमकौर साहिबमधील महालन या गावातील त्यांच्या घरी त्यांची पत्नी किंवा मुलगा दोघेही नाहीत. गावकऱ्यांच्या मते, जसबीरचे कुटुंब मंगळवारपर्यंत घरी होते, बुधवारपासून येथे कोणीही दिसले नाही. त्याच्या पालकांचे निधन झाले आहे, जसबीरचा एक भाऊ आहे, जो मोहालीमध्ये राहतो. अशी माहिती मिळाली आहे. (Pakistan Spy Jasbir Singh)

हे नंबर्स आयएसआय एजंट्सचे किंवा पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे …
जसबीर सिंगच्या (Pakistan Spy Jasbir Singh) मोबाईलमध्ये १५० पाकिस्तानी संपर्क क्रमांक सापडले आहेत. पोलिसांचा दावा आहे की, या नंबर्सची चौकशी सुरू आहे. असा संशय आहे की, हे नंबर्स पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआय एजंट्सचे किंवा अगदी पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे असू शकतात. (Pakistan Spy Jasbir Singh)

आयएसआय एजंट शाकीर उर्फ ​​जट्ट रंधावा याच्या संपर्कात
स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेलचे एआयजी डॉ. रवजोत गरेवाल यांच्या मते, जसबीर सिंग उर्फ ​​जान महल हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयशी संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. तो पाकिस्तानच्या एखाद्या संघटनेशीही संपर्कात आहे. त्यांनी पाकिस्तानला लष्कराची माहिती दिली असण्याची शक्यता आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अधिकारी दानिशच्या सूचनेनुसार, जसबीर दिल्लीतील पाकिस्तान दूतावासाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला. तिथे तो पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि युट्यूबर्सना भेटला. तो आयएसआय एजंट शाकीर उर्फ ​​जट्ट रंधावा याच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. (Pakistan Spy Jasbir Singh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.