Pahalgam Terror Attack : “ऑपरेटरने तीनवेळा ‘अल्लाहू अकबर’ म्हटलं अन्…”, ऋषी भट्ट यांनी NIA ला सांगितला घडलेला थरार, झिपलाइन ऑपरेटरची चौकशी सुरू

Pahalgam Terror Attack : "ऑपरेटरने तीनवेळा 'अल्लाहू अकबर' म्हटलं अन्...", ऋषी भट्ट यांनी NIA ला सांगितला घडलेला थरार, झिपलाइन ऑपरेटरची चौकशी सुरू

198
Pahalgam Terror Attack :
Pahalgam Terror Attack : "ऑपरेटरने तीनवेळा 'अल्लाहू अकबर' म्हटलं अन्...", ऋषी भट्ट यांनी NIA ला सांगितला घडलेला थरार, झिपलाइन ऑपरेटरची चौकशी सुरू

पहलगाम (Pahalgam Terror Attack ) दहशतवादी हल्ल्यानंतर या स्थळावरील विविध पर्यटकांनी केलेल्या व्हिडिओतून एक- एक सत्य समोर येऊ लागले आहे. एका व्हिडिओमध्ये “अल्लाहू अकबर” घोषणा देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला राष्ट्रीय तपास संस्था आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. शिवाय, झिपलाइन करणाऱ्या ऋषी भट्ट यांचीही साक्ष एनआयएने नोंदवली आहे. (Pahalgam Terror Attack )

प्रत्येक पर्यटकाची चौकशी सुरू
पहलगाम हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक पर्यटकांसह स्थानिक लोकांची एनआयएच्या वतीने चौकशी केली जात आहे. सर्वांना समन्स बजावून नेमकी घटना कशी झाली ? त्यावेळी तुम्ही कुठे होतात ? यासह अनेक बाजूंचा तपास केला जात आहे. सदर ऑपरेटर हा घोषणा देत होता. तर त्याच्या घोषणेनंतरच गोळीबाराला सुरूवात झाली, असा दावा देखील केला जात आहे. (Pahalgam Terror Attack )

ऋषी भट्ट काय म्हणाले ?
ऋषी भट्ट नावाच्या झिपलाइन करणाऱ्या व्यक्तीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, झिपलाइन ऑपरेटरने “अल्लाहू अकबर” असं म्हटलं आणि त्यानंतर लगेचच गोळीबार सुरू केला. ते झिपलाइनवर चढण्यापूर्वी त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर चार जण आधीच सुरक्षितपणे गेले होते. (Pahalgam Terror Attack )

नेमकं काय घडलं ?
प्रत्यक्षात गोळीबार सुरू झाल्याचे लक्षात येण्यासाठी सुमारे पंधरा ते वीस सेकंद लागले. भट्ट यांच्या मते, त्यांच्या व्हिडिओमध्ये एक माणूस खाली पडताना दिसला, ज्यामुळे त्यांना काहीतरी गंभीर गडबड असल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगितले की त्यांनी नंतर त्यांची झिपलाइन दोरी थांबवली, सुमारे 15 फूट उंचीवरून खाली उडी मारली आणि त्यांच्या पत्नी आणि मुलासह ते त्या ठिकाणाहून पळाले. त्यावेळी त्यांना जीव वाचवणे एकमेव उद्देश होता. त्यामुळे घटनास्थळारुन लांब जाण्यात त्यांना यश मिळाले. (Pahalgam Terror Attack )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.