भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी देणारा Yusuf Ansari तडीपार

भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी देणारा हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटी सचिव युसूफ अन्सारी(Yusuf Ansari)वर मुंबई पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.

84

भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी देणारा हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटी सचिव युसूफ अन्सारी(Yusuf Ansari)वर मुंबई पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकरवर कारवाईची मागणी केली होती. या कारवाईला तीव्र विरोध करणाऱ्या युसूफ अन्सारीने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धमकी दिली होती.(Yusuf Ansari)

(हेही वाचा रामपूरमधील तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण; ‘ATS’ने देखरेखीनंतर पकडलेल्या हेराबाबत धक्कादायक माहिती उघड )

दरम्यान, या धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अन्सारीविरुध्द तडीपारचे आदेश जारी केले असून पुढील १५ महिन्यांकरिता मुंबई, ठाण्यात प्रवेश करता येणार नाही. हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटी सचिव युसूफ अन्सारीने सोशल मीडियावर पोस्ट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरी येऊन आंदोलन करण्याची व घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती.

भाजप नेते सोमय्यांना मिळालेल्या धमकीनंतर इशान्य मुंबई भाजपचे प्रमुख दिपक दळवी यांनी मुलुंड पोलीस स्टेशन अधीक्षकांना पत्र लिहित युसूफ अन्सारीवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या युसूफ अन्सारी(Yusuf Ansari)ला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत १५ महिन्यांकरिता मुंबई, ठाण्यातून तडीपार केले आहे.(Yusuf Ansari)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.