YouTuber Jyoti Malhotra : “पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची” ; ज्योतीची कबुली

YouTuber Jyoti Malhotra : "पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची" ; ज्योतीची कबुली

75
YouTuber Jyoti Malhotra :
YouTuber Jyoti Malhotra : "पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची" ; ज्योतीची कबुली

हरियाणा राज्यातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा (YouTuber Jyoti Malhotra ) हिला देशातील संवेदनशील माहिती पाकड्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिला 17 मे रोजी अटक केली. न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पाकिस्तान अधिकाऱ्यांनी ती संवेदनशील माहिती पुरवत होती आणि पाकसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. (YouTuber Jyoti Malhotra )

दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताच्या इफ्तार पार्टीत ती सहभागी झाल्याचे आणि पाकिस्तानी अधिकारी दानिश याच्यासोबतचे व्हिडिओ समोर आले आहेत. दानिश हा पूर्वीपासूनच भारतीय गुप्तहेर संघटनांच्या रडारवर होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्याला 13 मे रोजीच ‘परसोना नॉन ग्राटा’ घोषीत करून देश सोडण्यास सांगितले. (YouTuber Jyoti Malhotra )

यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं हा तर फक्त एक बहाणा
हरियाणातील हिसार पोलिसांनी ज्योती मल्होत्राने चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले असल्याचे सांगितले आहे. ज्योती मल्होत्राने यापूर्वी सांगितले होतं की ती एक युट्यूबर आहे आणि ती तिच्या युट्यूब चॅनेलसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी देशभर आणि परदेशात फिरते. मात्र तिचं खोटं फार काळ टिकलं नाही आणि तिने तिच्या कारनाम्यांची कबुली दिली. यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं हा तर फक्त एक बहाणा आहे. ती पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची असं तिने कबूल केलं आहे. (YouTuber Jyoti Malhotra )

तिला पाकिस्तानात कुठेही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य
या कामासाठी तिला भरपूर पैसे तर मिळालेच, पण पाकिस्तान आणि चीनच्या भेटींमध्ये तिला व्हीआयपी वागणूकही मिळाली. जेव्हा जेव्हा ती पाकिस्तानला जात असे तेव्हा तिला पाकिस्तान पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जात असे, असेही ज्योती मल्होत्राने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. एवढंच नव्हे तर तिला पाकिस्तानात कुठेही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य होते. आपण पाकिस्तानमध्ये अनेक वेळा हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये भाग घेतल्याचंही ज्योतीने कबूल केलं. (YouTuber Jyoti Malhotra )

तीन वेळा पाकिस्तानला, एकदा चीनला आणि अनेक वेळा काश्मीरला गेली
ज्योतीच्या सांगणायानुसार, जेव्हा ती चीनच्या दौऱ्यावर गेली तेव्हाही तिला व्हीआयपी वागणूक मिळाली. ज्योतीचे वडील हरियाणातील वीज महामंडळातून निवृत्त झाले आहेत. ती त्यांच्यासोबत हिसारमध्ये राहते, पण तिच्या खर्चासाठी त्यांच्याकडून पैसे घेत नाही. युट्यूबमधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही ती हात लावत नाही. तिच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला. ती नेहमी विमान किंवा ट्रेनने फर्स्ट क्लासनेच प्रवास करायची आणि फक्त महागड्या हॉटेल्समध्येच राहायची. आतापर्यंत ती तीन वेळा पाकिस्तानला, एकदा चीनला आणि अनेक वेळा काश्मीरला गेली आहे, असं ज्योतीने हिसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सांगितलं. (YouTuber Jyoti Malhotra )

“ट्रॅव्हल विथ जो”
एवढंच नव्हे तर तिने पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत इंडोनेशिया, थायलंड, दुबई, भूतान, बांगलादेश आणि नेपाळचा प्रवासही केला आहे. तिचा पासपोर्ट 22 ऑक्टोबर 2018 रोजी बनवण्यात आला होता आणि तो 21 ऑक्टोबर 2028 पर्यंत वैध असल्याचे तिने पोलिस चौकशीदरम्यान सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून ती तिच्या “ट्रॅव्हल विथ जो” या युट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली देशभर आणि परदेशात फिरत आहे. दिल्लीतील एका शीख गटासोबत दोनदा पाकिस्तानातील करतारपूर साहिब गुरुद्वाराला गेली होती आणि एकदा एकटीच गेली होती असेही ज्योतीने चौकशीदरम्यान उघड केलं. (YouTuber Jyoti Malhotra )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.