Fake Call : यंत्रणांना विनाकारण त्रास द्याल; तर जेलची हवा खाल

मद्याच्या नशेत अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला खोटा कॉल दिल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी ३३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

156
Fake Call : यंत्रणांना विनाकारण त्रास द्याल; तर जेलची हवा खाल
Fake Call : यंत्रणांना विनाकारण त्रास द्याल; तर जेलची हवा खाल

मद्याच्या नशेत अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला खोटा कॉल (Fake Call) दिल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी ३३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. कॉल केल्यानंतर काय होते, ते पहायचे होते म्हणून कॉल केला होता असे उत्तर अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने दिले आहे. मात्र त्याच्या एका कॉलमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. (Fake Call)

वरळीतील पांडुरंग बुधकर मार्ग या ठिकाणी असणाऱ्या ‘महालक्ष्मी’ या एसआरए इमारतीत आग लागल्याचा कॉल शनिवारी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला आला होता. तात्काळ अग्निशमन दल वॉटर टँकर आणि इतर वाहनांसह घटनास्थळी दाखल झाले, घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांकडे आगीची चौकशी केली परंतु कुठेही आग लागली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी नियंत्रण कक्षाला खोट्या कॉल (Fake Call) बाबत माहिती दिली. (Fake Call)

दरम्यान मद्याच्या नशेत असणारी एक व्यक्ती अग्निशमन दलाचे अधिकारी हरिश्चंद्र नारकर यांच्याकडे गेली व त्याने कॉल मी केला होता असे सांगितले, कॉल का केला असे त्याच्याकडे विचारणा केली असता तो म्हणाला की, कॉल केल्यानंतर काय होते ते मला पहायचे होते असे त्याने उत्तर दिले. (Fake Call)

(हेही वाचा – Winter Session: लोकसभेत गोंधळ, काँग्रेसच्या गटनेत्यासह ३१ खासदार निलंबित)

रहिवाशांना द्यायचा होता त्रास

अग्निशमन दलाचे अधिकारी नारकर यांनी वरळी पोलिस ठाण्यात याबाबत कळवून या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खोटा कॉल केल्याप्रकरणी शिवराज उमेश अरुणथियार (३३) याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवराज उमेश अरुणथियार असल्याचे सांगितले, तो एसआरए महालक्ष्मी बिल्डिंगमध्ये राहणारा आहे. (Fake Call)

वरळीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराजने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कॉल केला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. त्याचा कोणताही वेगळा हेतू नव्हता, तो मद्याच्या नशेत होता, व त्याला कॉल करून बघायचे होते की काय होते आणि इमारतीतील रहिवाशांना त्रास द्यायचा होता. (Fake Call)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.