टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली(Virat Kohli)च्या मालकीचे बंगळुरूमधील ‘वन ८ कम्यून पब आणि रेस्टॉरंट’ पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. दरम्यान, पबमध्ये स्मोकिंग करण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र नसल्याने क्यूबन पार्क पोलिसांनी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्या(COTPA)च्या उल्लंघनासंदर्भात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी स्वतःहून खटला दाखल केल्यानंतर विराट कोहली(Virat Kohli)च्या मालकीच्या बंगळुरूमधील वन ८ कम्यून पब आणि रेस्टॉरंट पुन्हा अडचणीत सापडले आहे.(Virat Kohli)
दरम्यान, रेस्टॉरंटमध्ये धूम्रपान करण्यासाठी निश्चित क्षेत्र नसल्याबद्दल (COTPA)च्या कलम ४ आणि २१ अंतर्गत पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांतर्गत पब, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि विमानतळांसारख्या काही ठिकाणी स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे वन ८ कम्यूनवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम केल्याबद्दल गेल्या वर्षी जूनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. अग्निशमन विभागाकडून एनओसी न घेतल्याबद्दल स्थानिक प्रशासनाने डिसेंबरमध्ये रेस्टॉरंटला नोटीस बजावली होती.
शनिवार ३१ मे २०२५ दिवशी क्यूबन पार्क पोलिसांकडून वन८ कम्युन पब विरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांकडून दाखल केला गेलेला गुन्हा हा सार्वजनिक धूम्रपान नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी चालविलेल्या विशेष मोहिमेचा भाग आहे. महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक सरकारने हुक्का, बार यांवर पूर्णपणे बंदी आणल्यानंतर तंबाखूजन्य उत्पादने विकत घेण्यासाठी कायद्यानुसार व्यक्तीचे वय हे १८ वरून २१ वर्षे केल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी हा गुन्हा नोंदवला गेला आहे.(Virat Kohli)
Join Our WhatsApp Community