Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला शस्त्र परवाना गृहविभागाच्या परवानगीने मिळाला?; तपासातून माहिती समोर

Vaishnavi Hagawane Case :    वैष्णवी हगवणे प्रकरणा(Vaishnavi Hagawane Case)त पोलिसांनी आठ दिवस फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याची चौकशी करण्यात आली. वैष्णवीच्या आत्महत्येमागे निलेश चव्हाण याचा सहभाग होता किंवा नाही?, याचा तपास सध्या सुरू आहे.

113

Vaishnavi Hagawane Case :    वैष्णवी हगवणे प्रकरणा(Vaishnavi Hagawane Case)त पोलिसांनी आठ दिवस फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याची चौकशी करण्यात आली. वैष्णवीच्या आत्महत्येमागे निलेश चव्हाण याचा सहभाग होता किंवा नाही?, याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, निलेश चव्हाणला शस्त्रपरवाना देण्यामागे हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी दिल्याचा आरोप भाजप नेत्याकडून करण्यात आला.(Vaishnavi Hagawane Case)

(हेही वाचा Natural Disaster Relief : आपत्तीग्रस्तांना दिलासा! ४९ कोटींचा निधी मंजूर; विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश )

विशेष म्हणजे निलेश चव्हाण याच्यावर बलात्कारासारख्या गंभीर स्वरुपाच गुन्हे दाखल असताना यासंदर्भातील माहिती लपविण्यात आली. तसेच, त्याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. त्यामुळे आता गृह मंत्रालयाच्या परवानगीने निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात आला का?, असा सवालेदखील आता उपस्थित होत आहे.

(हेही वाचा घुसखोरी विरोधात BSF ने उचलली कठोर पावले ! DRDO ची मदत घेणार )

वैष्णवी हगवणे प्रकरणा(Vaishnavi Hagawane Case)त निलेश चव्हाणला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिला. गृह विभागाच्या बैठकीत झालेल्या सुनावणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी निलेश चव्हाणवर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत गृहराज्यमंत्र्यांना कळवणे अपेक्षित असतानाही ती माहिती लपवण्यात आल्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून ही माहिती लपवण्यात आली हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. याबाबत निलेश चव्हाण आपल्या राजकीय क्षेत्रातील ओळखींचा वापर हा शस्त्रपरवाना मिळवण्यासाठी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी काय म्हटले?

निलेश चव्हाण याने पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. २०२२ साली शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे त्याच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्याला शस्त्र परवाना नाकारण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे निलेशने आपल्या उच्चपदस्थ अधिकारी मित्राच्या सहकार्याने शस्त्र परवान्यासाठी प्रयत्न केले होते. गृह विभागाच्या बैठकीनंतर गृहराज्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात यावा, अशा सूचना पुणे पोलिसांना देण्यात आल्या होत्या.(Vaishnavi Hagawane Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.