Uttar Pradesh : उत्तर प्रदेशा(Uttar Pradesh)त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारने ७ जिल्ह्यांमध्ये बुलडोझर कारवाई करत २८६ बेकायदेशीर बांधकामे पाडली आहेत. योगी सरकारने नेपाळ सीमेलगत असणाऱ्या ७ जिल्ह्यांमध्ये बुलडोझर चालवत अनधिकृत २२५ मदरसे, ३० मशिदी, २५ मझारे, ०६ ईदगाह या बेकायदा बांधकामांवर तोडक कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेशाती श्रावस्ती भागात योगी सरकारने सर्वाधिक ११० बेकायदेशीर मदरशांवर कारवाई केली आहे. तर ०१ मशीद, ०५ धार्मिक स्थळे आणि ०२ ईदगाहवरही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर, बहराइचमध्ये १३ मदरसे, ०८ मशिदी, ०२ मकबरा आणि ०१ ईदगाह जमीनदोस्त करण्यात आले.
दरम्यान, योगी सरकारने नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशा(Uttar Pradesh)तील जिल्ह्यांमध्ये एक मोठी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत बेकायदेशीर मशिदी आणि मदरशांवर कारवाई केली जात असून अलीकडेच ७ जिल्ह्यांमधील २२५ बेकायदेशीर मदरसे हटवण्यात आले आहेत. याशिवाय, बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ३० मशिदी, २५ धार्मिक स्थळे आणि ०६ ईदगाह देखील पाडण्यात आल्या आहेत.
योगी सरकारने कुठे-कुठे केल्या कारवाया?
बेकायदा बांधकामांवरील सर्व कारवाया नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहराइच, लखीमपूर खेरी आणि पिलीभीत येथे झाल्या. बेकायदेशीर जमिनीवर बांधलेले सर्व मदरसे, मशिदी, मजार आणि ईदगाह बुलडोझरने पाडण्यात आले. यापैकी, सर्वाधिक मदरसे श्रावस्ती जिल्ह्यात आढळून आले आहेत. पिलीभीतमध्ये अवैध मशीद सापडली असून त्यावरही कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दि. १४ मे २०२५ रोजी महाराजगंजमधील २९ मदरसे, ०९ मशिदी, ०७ धार्मिक स्थळे आणि एका ईदगाहवर कारवाई करण्यात आली. सिद्धार्थनगरमध्ये ३५ मदरसे आणि ०९ मशिदी जमीनदोस्त करण्यात आल्या असून बलरामपूर जिल्ह्यात ३० मदरसे, १० मजार आणि ०१ ईदगाह जमीनदोस्त करण्यात आल्या. (Uttar Pradesh)
Join Our WhatsApp Community