Uttar Pradesh मधील विद्यापीठात बनावट पदव्यांचा गोरखधंदा, ‘४-४ लाखांत…’; एसटीएफच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

Uttar Pradesh :  उत्तर प्रदेशा(Uttar Pradesh)तील हापूर येथील मोनाड विद्यापीठात बनावट पदवी वाटप होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) स्पेशल टास्क फोर्सने मोनाड विद्यापीठावर छापा टाकत अध्यक्ष विजेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह १० जणांना अटक केली आहे.

129

Uttar Pradesh :  उत्तर प्रदेशा(Uttar Pradesh)तील हापूर येथील मोनाड विद्यापीठात बनावट पदवी वाटप होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) स्पेशल टास्क फोर्सने मोनाड विद्यापीठावर छापा टाकत अध्यक्ष विजेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह १० जणांना अटक केली आहे. एसटीएफच्या कारवाईत १३७२ बनावट गुणपत्रिका, २६२ बनावट ट्रान्सफर सर्टिफिकेट, मोबाईल फोन, आयपॅड, ७ लॅपटॉप,२६ सर्व्हर मशीन, ६ लाखांहून अधिक किमतीची रोख रक्कमदेखील जप्त करण्यात आली आहे.

(हेही वाचा Permanent State Guest : मुख्य न्यायमूर्तींच्या दौऱ्यामुळे राज्यात प्रशासन सतर्क! सरकारकडून राजशिष्टाचारासाठी ‘विशेष सर्क्युलर’ जारी )

दरम्यान, एसटीएफच्या कारवाईत असा आरोप ठेवण्यात आला आहे की, मोनाड विद्यापीठातून बनावट गुणपत्रिकांचा व्यवसाय चालवला जात होता. ५ हजार रुपये छपाई किंमत जेव्हा विद्यापीठातील विद्यार्थी-खरेदीदारांपर्यंत पोहोचते तेव्हाची किमंत ५० हजार रुपयांपासून ५ लाखांपर्यंत जात असल्याचे तपासातून उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे हापूरचे मोनाड विद्यापीठ सद्यस्थितीस घोटाळे, बाईक-बोट घोटाळा आणि कर्मचाऱ्यांचे शोषण असे धक्कादायक प्रकार विद्यापीठात सुरू असल्याचे दिसून आले आहे.

(हेही वाचा Uttar Pradesh : “२२५ मदरसे, ३० मशिदी…”; बेकायदा बांधकामांवर योगी सरकारची बुलडोझर कारवाई )

मोनाड विद्यापीठाचे अध्यक्ष विजेंद्र सिंह हुडा, जे एकेकाळी उत्तर प्रदेश पोलिसांचे ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेले गुन्हेगार होते. त्याने न्यूज वर्ल्ड इंडिया चॅनेलद्वारे बनावट पदवी घोटाळा, बाईक-बोट घोटाळा आणि कर्मचाऱ्यांचे शोषण असे अनेक घोटाळे केले आहेत. विजेंदर सिंग हुड्डा यांनी हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून गोरखधंदा सुरू केला आहे. एसटीएफच्या तपास अहवालात मोनाड विद्यापीठाचे कामकाज आणि त्यातील फसवणूकीचे तपशीलवार दिले आहे.

मोनाड विद्यापीठात बनावट पदव्यांच्या गोरखधंदा

मोनाड विद्यापीठ. मोनाड विद्यापीठ हापूरमधील पिलखुआ येथे असून विजेंद्रने २०२२ मध्ये ते विकत घेतले होते. त्यानंतर आता विद्यापीठ बनावट पदव्यांच्या विक्रीचे केंद्र बनले असल्याचे समोर आले असून २०१९ मध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या प्रकरणात या विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मोनाड विद्यापीठात बीए, बीएड, बी.टेक, फार्मासिस्ट आणि बीए-एलएलबी सारख्या अभ्यासक्रमांच्या पदव्या ५०,००० ते ४ लाख रुपयांना विकल्या जात होत्या. दि. १७ मे २०२५ एसटीएफच्या छाप्यात १३७२ बनावट गुणपत्रिका, २८२ बनावट तात्पुरती आणि स्थलांतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ,तसेच, याप्रकरणी विद्यापीठाचे अध्यक्ष विजेंद्र यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे.(Uttar Pradesh)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.