Ujjain Love Jihad Case : मुस्लिम नफीस बनला ‘कानू’, हिंदू मुलीशी केली मैत्री, अन् नंतर म्हणाला…

99
राज्यांसह देशभरात मागील काही वर्षांपासून लव जिहादच्या (Love Jihad) घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये धर्मांध हिंदू मुलींना फूस लावून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या गैरफायदा घेण्याच्या घटनाही मोठ्या प्रमणात घडत आहेत. अशातच मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधील उज्जैन (Ujjain) येथे लव जिहादची (Love Jihad case) घटना घडली आहे. यामध्ये एक मुस्लिम तरुणाने सोशल मीडियावर एका मुलीला त्याचे नाव आणि ओळख हिंदू सांगून मैत्री केली, पण जेव्हा मुलीला त्या मुलाचा धर्म आणि त्याचे वास्तव कळले. तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तसेच त्या तरुणाने मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली. (Ujjain Love Jihad Case)

(हेही वाचा – स्थानिक निवडणुकांसाठी BJP चा मेगा मास्टरप्लॅन; महाविकास आघाडीला गळतीचा धोका!)

हे संपूर्ण प्रकरण जिवाजीगंज पोलीस स्टेशन (JiwajiGanj Police Station) ठाण्याच्या हद्दीत घडले आहे. या प्रकरणाची माहिती देताना बजरंग दलाचे (Bajrang Dal) सोनू जैन म्हणाले की, जिवाजीगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका मुलीच्या मोबाईलवर २ महिन्यांपूर्वी फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ही फ्रेंड रिक्वेस्ट कानू पटेल नावाच्या तरुणाने पाठवली होती. तो मुलीच्या घराजवळ राहतो. मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघेही बोलू लागले.

मुलीला मुलाचे वास्तव कळले
सोनू जैन यांनी सांगितले की, काही दिवसांत कानूने मुलीवर प्रेम व्यक्त केले आणि तिच्याशी लग्न करण्याबद्दलही बोलले, पण त्याच दरम्यान, मुलीला कळले की कानूचे खरे नाव नफीस आहे, जो उत्तर प्रदेशातील तुर्कौलिया येथील गुलहरिया घाट येथील रहिवासी सगीर खानचा मुलगा आहे. तो आपला धर्म आणि नाव लपवून तिच्यावर प्रेम करण्याचे खोटे नाटक करत आहे.

(हेही वाचा – तीन हजार रुपयात नवीन FASTag आधारित वार्षिक पास मिळणार ; Nitin Gadkari यांची घोषणा)

धमकी दिली आणि भेटायला बोलावले
यानंतर मुलीने मुलाला संपूर्ण सत्य सांगितले. त्यानंतर नसीफने मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला विष्णू सागर येथे भेटायला बोलावले, जिथे त्याने प्रथम मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन फसवले, नंतर तिला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. त्याने मुलीसोबत अश्लील कृत्येही करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला
यावर मुलीने ताबडतोब तिच्या वडिलांना फोन करून घटनास्थळी बोलावले, जिथे बजरंग दल आणि इतर लोकांनी त्या तरुणाला पकडून जिवाजीगंज पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. या प्रकरणात, नफीसविरुद्ध कलम ७४, ७५, ३१९ (२), ३५१ (३) बीएनएस आणि ३/५ एम.पी. धार्मिक स्वातंत्र्य कायदा २०२१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

(हेही वाचा – Iran – Israel War प्रकरणी रशियाची प्रतिक्रिया, जगाला आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले)

धर्म बदलण्यासाठी दबाव
मुलीने जिवाजीगंज पोलीस ठाण्यात सांगितले की, नफीसने त्याचा धर्म लपवून तिच्याशी मैत्री केली. नंतर, तो तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिला धर्म बदलण्यासाठी दबाव आणत होता. तिने अनेकदा हे करण्यास नकार दिल्यावर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. नफीसला अटक केल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा मोबाईल तपासला. नफीसच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. या प्रकरणात, नफीस लव्ह जिहादच्या नावाखाली फक्त या मुलीला त्रास देत होता की, त्याने इतर मुलींनाही अशाच प्रकारे फसवले होते याचा तपास जिवाजीगंज पोलीस करत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.