Transnational Drug Syndicate : स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करणारा नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिक गुरुनाथ चिचकरचा मुलगा ‘ट्रान्सनॅशनल ड्रग सिंडिकेट’ प्रमुख नवीन चिचकरला (Drug smuggler Naveen Chichkar) (३५) मलेशियातून हद्दपार करण्यात आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अटक केली आहे. चिचकरला बुधवारी भारतात आणण्यात आले असून गुरुवारी त्याला मुंबईत आणून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकारी यांनी दिली. (Transnational Drug Syndicate)
(हेही वाचा – भारताने १००० हून अधिक घुसखोर पाठवले सीमेपार; जाणून घ्या ‘Operation Push Back’ काय आहे ?)
नवीन चिचकरने चालवलेल्या कार्टेलने भारतात १,१२८ कोटी रुपयांचे ड्रग्ज विकले, त्यात कोकेन आणि हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक वीडचा (गांजा) समावेश होता, जे अमेरिकेतून कार्गो शिपमेंटद्वारे आणले गेले होते, असे अधिकारी यांनी सांगितले. एनसीबीने जारी केलेल्या रेड-कॉर्नर नोटीसनंतर (Red-corner notice) चिचकरला मलेशियामध्ये शोधण्यात आले आणि अटक करण्यात आली, अशी माहिती एनसीबीने दिली.एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मलेशियातून त्याची कोठडी मिळवण्यात यश मिळवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२१ जानेवारी २०२५ रोजी मुंबईहून ऑस्ट्रेलियाला कुरिअर फर्मद्वारे पाठवल्या जाणाऱ्या पार्सलमधून प्रोजेक्टरमध्ये लपवलेले २०० ग्रॅम कोकेन जप्त केल्यानंतर चिचकर याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा सहभाग उघडकीस आला, असे त्यांनी सांगितले.या प्रकरणाच्या पुढील कारवाईत, एनसीबीने नवी मुंबईतील सिंडिकेटच्या एका सदस्याच्या घरातून ११.५४० किलो कोकेन, ४.९ किलो गांजा आणि ५.५ किलो गांजा जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. तपासादरम्यान, एक उत्तम दर्जाचा आंतरराष्ट्रीय सिंडिकेट अमेरिकेतून भारतात कोकेनची तस्करी करण्यात आणि भारतात आणि बाहेर त्याच्या वितरणात सहभागी असल्याचे उघडकीस आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.तपासादरम्यान क्लिअरिंग हाऊस एजंट्स (सीएचए) आणि हवाला ऑपरेटर्सचा सहभागही समोर आला.
एनसीबीने चिचकरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती, असे एनसीबीचे अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर तो मलेशियात सापडला. “त्यानुसार, भारत सरकारने मलेशियन अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आणि चिचकरला ताब्यात घेण्यात आले. घावटे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबी अधिकाऱ्यांच्या पथकाने मलेशियातील इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या मदतीने त्याचा ताबा मिळवला,” असे ते म्हणाले.चिचकरला भारतात आणण्यात आले आहे आणि गुरुवारी दुपारी त्याला मुंबईत नेण्यात येईल, जिथे त्याला न्यायालयात हजर केले जाईल, असे अधिकारी यांनी सांगितले. तपासादरम्यान, हे सिंडिकेट किमान एक वर्षापासून कार्यरत असल्याचे समोर आले आणि या काळात मुंबईत विमानाने कोकेनच्या अनेक खेपा पोहोचल्या होत्या, असे ते म्हणाले.
मालमत्ता जप्त
मलेशियाहून आणलेल्या या सिंडिकेट मुख्य प्रमुख नवीन चिचकर यांची चौकशी केल्यानंतर त्याच्या कृत्यांची अधिक माहिती मिळण्याची शक्यता एनसीबीने वर्तवली आहे. या प्रकरणातील आर्थिक तपासामुळे थायलंडमधील मालमत्ता आणि बँक खात्यांसह मालमत्तांची ओळख पटली आहे, या मालमत्ता जप्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
(हेही वाचा – Sunita Jamgade : पाकिस्तानातून परतलेली महाराष्ट्राची सुनीता जामगडे बीएसएफच्या रडारवर ; प्रकरण काय ?)
नवीन चिचकरच्या वडिलांची आत्महत्या
एप्रिल महिन्यात नवीन चिचकर याचे वडील आणि नवीमुंबईतील बांधकाम व्यवसायिक गुरुनाथ चिचकर (Gurunath Chichkar) यांनी स्वतःच्या कार्यालयात पिस्तूलने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, त्यात म्हटले होते की, एनसीबी अधिकारी आणि नवी मुंबई पोलिसांकडून वारंवार समन्स बजावल्यामुळे तो मानसिक ताण सहन करू शकत नव्हता, कारण त्याचे दोन मुलगे नवीन आणि धीरज ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले.
अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार नवीन चिचकर याने लंडनमध्ये गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे आणि चित्रपट आणि दूरदर्शनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
हेही पहा –