Fraud : बनावट टूर ऑपरेटरकडून ७२ डॉक्टरांची २ कोटी रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल

57
Fraud : वाहन भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून १,३७५ जणांची फसवणूक; दोघांना अटक
  • प्रतिनिधी

एका टूर ऑपरेटरने अझरबैजान देशाचे स्वप्न दाखवून ७२ डॉक्टरांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून टूर ऑपरेटरला या प्रकरणात अटक करण्यात आली नाही. जवळपास २ कोटींची ही फसवणूक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Fraud)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टूर ऑपरेटर शरद हेगडे नोव्हेंबर २०२४ मध्ये भारतीय प्रसूती आणि स्त्रीरोग सोसायटीज फेडरेशन (FOGSI) च्या परिषदेदरम्यान पवई येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये डॉक्टरांना भेटला होता. FOGSI ने आयोजित केलेल्या या परिषदेत देशभरातून सुमारे २०० डॉक्टर उपस्थित होते. शेवटच्या दिवशी, १७ नोव्हेंबर रोजी, हेगडे यांनी बैठकीला उपस्थित राहून सांगितले की, ते ग्लोबल मीडियाचे संस्थापक आहेत. त्यांनी कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून स्वतःला सादर केले आणि सांगितले की ते परदेशात सहलींचे आयोजन देखील करतात. (Fraud)

(हेही वाचा – Mohammad Azharuddin : हैद्राबादमधील स्टेडिअमवरून मोहम्मद अझहरुद्दीनचं नाव हटवलं, अझर कोर्टात जाणार)

डॉक्टरांचा विश्वास जिंकण्यासाठी, हेगडे यांनी त्यांना त्यांनी आयोजित केलेल्या परदेशी सहलींचे फोटो दाखवले आणि त्यांना त्याचा सल्ला आवडला. त्यापैकी काहींनी अझरबैजानमधील बाकू हे त्यांचे ठिकाण म्हणून सुचवले. डॉक्टरांना एकत्र करण्यासाठी आणि प्रवास योजनांवर चर्चा करण्यासाठी हेगडे याने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या टूर (सहल) साठी ८८ डॉक्टर सामील झाले आणि हेगडे यांनी एका आठवड्यात प्रवासाची रूपरेषा सादर करण्याचे आश्वासन दिले. २१ नोव्हेंबर रोजी, हेगडे यांनी त्यांना सांगितले की या ट्रिपचा खर्च प्रत्येकी १.५ लाख रुपये असेल त्यात व्हिसा शुल्क, प्रवास खर्च आणि जेवण आणि राहण्याचा खर्च समाविष्ट आहे. (Fraud)

या टूरसाठी ७२ डॉक्टरांनी नोंदणी केली आणि त्यांना ७ एप्रिल २०२५ पर्यंत पैसे भरण्यास सांगितले. १८ ते २४ मे या दरम्यान ही सहल नियोजित होती. येणाऱ्या डॉक्टरांनी हेगडे यांच्या कंपनीच्या नावावर असलेल्या बँक खात्यात टूरचे पैसे पाठवले असे एकूण २.१४ कोटी रुपये जमा झाले. हेगडेने सर्वांना रक्कम भरल्याच्या पावत्याही दिल्या. त्यानंतर हेगडे यांच्याकडून पुढे कुठलीही हालचाल दिसून येत नव्हती. ७ एप्रिल रोजी हेगडे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर दावा केला की काही डॉक्टरांनी पैसे उशिरा ट्रान्सफर केल्यामुळे ट्रिप रद्द होत आहे आणि लवकरच तुम्हा सर्वांची रक्कम परत करू असे हेगडे याने डॉक्टरांच्या ग्रुपवर मेसेज पोस्ट केल्यामुळे ग्रुपमध्ये फसवणुकीची चर्चा सुरू झाली. (Fraud)

(हेही वाचा – Indian army : आता सियाचीनमध्येही थेट 5 जी नेटवर्क ; सैनिकांना कुटुंबीयांशी बोलता येणार !)

डॉक्टरांनी दिलेली रक्कम परत मागायला सुरुवात केली तेव्हा हेगडेने काही डॉक्टरांना १३.१० लाख रुपये परत केले. सतत पाठपुरावा करून आणि वारंवार आठवण करून देऊनही, उर्वरित २ कोटी रुपये कधीही परत करीत नसल्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, हे कळल्यानंतर डॉक्टरांनी दादर पोलीस ठाण्यात शरद हेगडेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी हेगडेविरुद्ध फसवणुकीसाठी कलम ३१८ (३) आणि भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या फौजदारी विश्वासघातासाठी कलम ३१६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शरद हेगडे याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. (Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.