Wankhede Stadium : पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची भाषा; वानखेडे स्टेडियम उडवण्याचीही धमकी; मुंबई पोलिस सतर्क 

विश्वचषक सामन्यांसाठी संपूर्ण देश सज्ज झाला असताना पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची व मुंबईतील वानखेडे स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

89
Wankhede Stadium : पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची भाषा; वानखेडे स्टेडियम उडवण्याचीही धमकी; मुंबई पोलिस सतर्क 
Wankhede Stadium : पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची भाषा; वानखेडे स्टेडियम उडवण्याचीही धमकी; मुंबई पोलिस सतर्क 

विश्वचषक सामन्यांसाठी संपूर्ण देश सज्ज झाला असताना पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियम उडवण्याची धमकी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. (Wankhede Stadium) धमकी देणाऱ्या व्यक्तीने ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यासह गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला सोडण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा, सायबर गुन्हे शाखेकडून ईमेल पाठविणाऱ्याचा माग काढण्यात येत आहे. मुंबई पोलिस सतर्कता म्हणून वानखेडे स्टेडियम परिसराची तपासणी करीत आहेत. (Wankhede Stadium)

(हेही वाचा – ICC World Cup 2023 : भारतीय संघाचं इन्स्टाग्राम रील व्हायरल, त्यात विराट नसल्यामुळे चाहते नाराज)

५०० कोटी रुपये आणि लॉरेन्स बिष्णोई हवा

तुमच्या सरकारकडून ५०० कोटी रुपये आणि लॉरेन्स बिष्णोई हवा आहे. नाहीतर मोदी यांच्यासह वानखेडे स्टेडियम उडवण्यात येईल. भारतात सगळं विकत जात, आम्ही काही खरेदी केली आहे. कितीही सुरक्षा पुरवा. आमच्यापासून वाचणार नाही, अशा आशयाचा मजकूर ई मेलमध्ये आहे. तसेच संपर्क साधायचा असेल, तर त्याच ईमेलवर संपर्क साधावा, असे नमूद केले आहे. त्यानंतर संंपूर्ण देशभरातील यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Wankhede Stadium)

मुंबई पोलिसांना गेल्या ५ महिन्यांत खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे ८० हून अधिक खोटे दूरध्वनी आले आहेत. गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकावर आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलू दिले नाही, तर बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केल्यानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयिताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. (Wankhede Stadium)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.