ऐकावे ते नवलच! चोराने चोरलेले दागिने केले परत

197
ऐकावे ते नवलच! चोराने चोरलेले दागिने केले परत
ऐकावे ते नवलच! चोराने चोरलेले दागिने केले परत

चोराने एकदा चोरलेली वस्तू परत केल्यास तो त्याचा प्रामाणिकपणा म्हणायचे की, त्याला झालेला पश्चाताप! पालघर जिल्ह्यातील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या जनसंवाद अभियानानंतर एका चोराला उपरती झाली आणि त्याने चोरलेले ३ लाख २०हजार रुपये किमतीचे दागिने गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या दारात ठेवून निघून गेला. मात्र हा चोर कोण होता, त्याने चोरी का केली याबाबतची कुठलीही माहिती पोलिसांना देखील मिळू शकलेली नाही.

(हेही वाचा – Women’s Hostel Crime : महिला वसतिगृहातल्या सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या; आरोपीची रेल्वेखाली आत्महत्या)

नक्की काय घडले?

पालघर जिल्ह्यातील केळवा येथील मांगेल वाडा या ठिकाणी एका व्यक्तीच्या घरी ३१ मे रोजी चोरी झाली होती. चोरट्याने घरात घुसून ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने लांबवले होते. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. चोरी कोणी केली याबाबत कुठलाही मागमूस लागलेला नव्हता, दरम्यान पालघर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गावोगावी ‘जनसंवाद अभियान’ आयोजित करण्यात आले होते. या जनसंवाद अभियानाच्या बैठकी दरम्यान पोलीस गावकऱ्यांसोबत संवाद साधू लागले, या बैठकीच्या दरम्यान केळवा मांगेलवाडा येथे पोलिसांनी गावकऱ्यांना आवाहन केले की, ज्याने गावात चोरी करून दागिने चोरले असेल त्याने समाजाप्रती प्रामाणिकपणा आणि निष्ठा दाखवण्यासाठी ते परत केले पाहिजे. या आवाहनानंतर मंगळवारी पहाटे मांगेलवाडीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरासमोर चोरीला गेलेले ३ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने मिळून आले. पोलिसांनी ‘जनसंवाद अभियान’ दरम्यान केलेल्या आवाहनाचा चोरावर एवढा परिणाम झाला की या चोरट्याने चोरलेले सर्व दागिने परत केले. परंतु चोर कोण होता, त्याने चोरी का केली याबाबत मात्र कळू शकलेले नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.