निलंबित पोलिस अधिकारी Ranjit Kasle अखेर पोलिसांच्या ताब्यात

381

निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेने (Ranjit Kasle) गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे, संतोष देशमुख खून (santosh deshmukh case) प्रकरणातील प्रमुख आरोप वाल्मिक कराड यांचे नाव घेत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. वाल्मिक कराडचे (Valmik Karad) एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा दावाही कासले यांनी केला होता. दरम्यान बीड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट (Swargate) परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे कासले यांना ताब्यात घेतले.

(हेही वाचा – आपले सरकार पोर्टलवर सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई केल्यास दरदिवशी 1 हजाराचा दंड ; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश)

मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. पुणे विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा गंभीर आरोप केले होते. पुणे पोलिसांना शरण जाऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजीत कासले यांनी सांगितलं होतं मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी ताब्यात घेतले.

पुण्यात दाखल झाल्यानंतर कासलेने माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्याने सांगितले की, एन्काउंटरसंबंधी चर्चा या बंद दाराआडच्या आहेत, मी जे पुरावे सादर करतोय. मला त्याबाबत विचारावे. असे तो म्हणाला. ज्या दिवशी मतदान होते, त्या दिवशी महादेव कराड आणि काळे हे पार्टनर असलेल्या संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनीच्या खात्यातून माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये आले असा गौप्यस्फोट कासले यांनी केला. (Ranjit Kasle)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.