Sudan Abyei Clash: सुदानमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५२ जणांचा जागीच मृत्यू

या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

172
Sudan Abyei Clash: सुदानमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५२ जणांचा जागीच मृत्यू
Sudan Abyei Clash: सुदानमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५२ जणांचा जागीच मृत्यू

साउथ आफ्रिकेतील (Sudan Abyei Clash) सुदान शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथील अबेई परिसरात बंदूकधारी आणि गावकऱ्यांमध्ये चकमक झाली. यावेळी बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात ५२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ६४ हून अधिक लोकं जखमी झाले.

ही घटना रविवारी (२८ जानेवारी) घडली. यामध्ये जमखी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – Copy Free Exam Bbharari Squads: दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथके नेमणार, वाचा शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला )

अबेईचे माहिती मंत्री बुलिस कोच यांनी या घटनेबाबत दिलेली माहिती अशी की, अबेई येथील गावकरी आणि बंदूकधाऱ्यांमध्ये रविवारी चकमक झाली. यावेळी बंदूकधाऱ्यांनी गावकऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात महिला, लहान मुलांसह अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कोणत्या कारणामुळे याचे कारण अद्याप उघड झालेले नाही, मात्र जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

जमिनीच्या कारणावरून वाद

कोच यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या हिंसाचारात सहभागी असलेले हल्लेखोर नुएर जमातीचे होते. ते मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज होते. या सशस्त्र तरुणांनी गेल्या वर्षी पुरामुळे त्यांच्या भागातून वराप राज्यात स्थलांतर केले होते. यावरून त्यांचा गावकऱ्यांशी जमिनीच्या कारणावरून वाद झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.