पळकुट्या Mehul Choksi वर कडक कारवाई; बँक खाते, शेअर्स आणि म्युच्युअल फंड खाती जप्त करण्याचे दिले आदेश

64
Mehul Choksi : सेबीने फरार हिरे (Diamond) व्यापारी मेहुल चोक्सीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. सेबीने मेहुल चोक्सीचे बँक खाते, म्युच्युअल फंड आणि शेअर्स जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून २.१ कोटी रुपये वसूल होतील. गीतांजली जेम्सच्या शेअर्समध्ये इनसायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने चोक्सीवर २.१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यामध्ये १.५ कोटी रुपयांचा दंड आणि ६० लाख रुपयांचे व्याज समाविष्ट आहे.  (Mehul Choksi)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात; ‘गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही’)

सेबीचा आदेश काय आहे ?
४ जून २०२५ रोजी जारी केलेल्या जप्तीच्या सूचनेत सेबीने म्हटले आहे की, २.१ कोटी रुपयांच्या प्रलंबित थकबाकीमध्ये १.५ कोटी रुपयांचा प्रारंभिक दंड आणि ६० लाख रुपयांचे व्याज समाविष्ट आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी, सेबीने सर्व बँका, ठेवीदार आणि म्युच्युअल फंड कंपन्यांना चोक्सीच्या खात्यांमधून कोणत्याही प्रकारचे पैसे काढण्याची परवानगी देऊ नये असे सांगितले. याशिवाय, सेबीने बँकांना डिफॉल्टरच्या लॉकरसह सर्व खाती जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
जानेवारी २०२२ मध्ये दिलेल्या आदेशात, सेबीने चोक्सीवर १.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता आणि त्याला एका वर्षासाठी सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली होती. सेबीला चौकशीत असे आढळून आले की, चोक्सीने राकेश गिरधरलाल गजेरा यांना संवेदनशील माहिती दिली होती. गजेरा यांनी फसवणूक प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच डिसेंबर २०१७ मध्ये गीतांजली जेम्समधील संपूर्ण ५.७५ टक्के हिस्सा विकला होता.
चौक्सीवर १४,००० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोप
नीरव मोदीचा काका मेहुल चोक्सी याच्यावर सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेची (PNB) १४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा आरोप आहे. २०१८ च्या सुरुवातीला पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघेही देश सोडून पळून गेले. भारतीय तपास यंत्रणांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर एप्रिलमध्ये बेल्जियमच्या अँटवर्प शहरातून ६५ वर्षीय चौक्सीला अटक करण्यात आली.
(हेही वाचा – पुनर्विकसित इमारतींना ‘ओसी’; MHADA ची ३१ डिसेंबरपर्यंत विशेष अभय योजना)
२०१८ मध्ये भारत सोडल्यापासून चोक्सी अँटिग्वामध्ये राहत होता. २०२३ मध्ये, चोक्सी वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियमला ​​गेला होता, तेव्हा तो तिथेच होता. सध्या तो भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून कोठडीत आहे आणि पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी त्याचा पुतण्या नीरव मोदी (Nirav Modi) देखील यूकेच्या तुरुंगात आहे. 
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.