Spy Ansarul Ansari : कतारमध्ये कॅब चालविणारा नेपाळचा अन्सारुल अन्सारी(Spy Ansarul Ansari) आयएसआय एजंट असल्याचे समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय तपास यंत्रणांकडून ११ हेरांना अटक करण्यात आली. यापैकी एक असलेल्या ज्योती मल्होत्राची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी करण्यात येत असून तपासातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, कतारमध्ये कॅब चालविणारा नेपाळचा अन्सारुल अन्सारी(Spy Ansarul Ansari) आयएसआय एजंट असल्याचे समोर आले आहे. अन्सारुल अन्सारीला अटक करण्यात आली असून त्याला पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर आयएसआय हँडलरला भेटल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कतारमध्ये कॅब चालविणारा नेपाळचा अन्सारुल अन्सारी(Spy Ansarul Ansari) कतारमध्ये आयएसआयच्या एका हँडलरला भेटल्यानंतर अन्सारुलचे ब्रेनवॉश करून त्याला पाकिस्तानातील रावळपिंडी येथे नेण्यात आले. तेथेच आयएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अन्सारुलला हेरगिरीचे प्रशिक्षण दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्ली पोलीस आणि तपास यंत्रणांनी एक मोठी कारवाई करत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या दोन हेरांना अटक केली आहे.
(हेही वाचा पंतप्रधान Narendra Modi यांचा पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा; म्हणाले, “”माझ्या नसांमध्ये रक्त…” )
अटक केलेल्या दोन हेरांमध्ये एक नेपाळी वंशाचा अन्सारुल मिया अन्सारी असून त्याला दिल्लीतील एका हॉटेलमधून पकडण्यात आले होते. गुप्तचर माहितीच्या आधारे दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्सारुलला ताब्यात घेण्यात आले. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कारवाईत अन्सारुल(Spy Ansarul Ansari)कडून भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही सर्व कागदपत्रे पाकिस्तानला पाठविण्याच्या प्रयत्नात अन्सारुल असल्याचे उघड झाले.
अन्सारुल अन्सारीला दिल्लीतून केले अटक
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारुल २००८ पासून कतारमध्ये कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत होता. एका आयएसआय हँडलरच्या भेटीत अन्सारुलला लोभ आणि वैचारिक चिथावणी देऊन आपल्या जाळ्यात अडकविले. जून २०२४ मध्ये, अन्सारुल(Spy Ansarul Ansari)ला पाकिस्तानातील रावळपिंडी येथे नेण्यात आले, जिथे आयएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला हेरगिरीचे प्रशिक्षण दिल्याचे तपासात उघड झाले. विशेषतः भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रे, छायाचित्रे आणि भौगोलिक स्थान डेटा गोळा करण्याचे काम अन्सारुलला देण्यात आले होते. त्यानंतर नेपाळमार्गे भारतात पाठवून दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार होता, असा संशय त्याच्यावर आहे.
तपास यंत्रणांना मिळाली होती कटाची माहिती
जानेवारी २०२५ मध्ये तपास यंत्रणांना गुप्त माहिती मिळाली होती की आयएसआयचा एक गुप्तहेर नेपाळमार्गे दिल्लीत प्रवेश करणार आहे. यामाहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आणि केंद्रीय यंत्रणांनी संयुक्तपणे एक गुप्त कारवाई सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय यंत्रणा प्रत्येक पावलावर अन्सारुलपेक्षा पुढे होत्या. दिल्लीत एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली जात असल्याचेही तपासात उघड झाले. ज्यामध्ये लष्करी तळांची गोपनीय माहिती वापरली जाणार होती.(Spy Ansarul Ansari)
Join Our WhatsApp Community