-
प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली शहरात मागील काही महिन्यांपासून बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात (Bangladeshi Infiltrators) पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मागील काही दिवसांत ६ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांत या दोन्ही शहरांतून अटक करण्यात आलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची संख्या ३८ झाली आहे.
(हेही वाचा – Vizhinjam Port : भारताच्या सागरी क्षेत्रातील विकासाचं नवं पर्व, देशातलं पहिलं खोल पाण्यातील…)
ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत पोलीस ठाणे बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबत (Bangladeshi Infiltrators) शोधमोहिम राबविण्यात आली होती. त्याअनुषंगाने गोपनीय बातमीव्दारे कल्याण व डोंबिवली शहरांमधील संशयित इसमांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांच्याजवळील आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात आली. संशयित इसमांच्या कागदपत्रांच्या चौकशी दरम्यान ६ बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याविरुद्ध पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३,४ विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १३,१४(अ) (ब) प्रमाणे कारवाई करून महात्मा फुले चौक, खडकपाडा, बाजारपेठ आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Indo – Pak Cricket : आशियातील अनिश्चिततेचा क्रिकेटला बसणार आहे फटका)
मागील तीन महिन्यांपासून सुरु करण्यात आलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधी (Bangladeshi Infiltrators) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान कल्याण-डोंबिवली शहरातून ३८ अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापुढेही कल्याण व डोंबिवली शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई सुरु ठेवणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community