“माझी मुलगी राजाचा जीव घेऊच शकत नाही…”; ‘Sonam Raghuvanshi’च्या वडिलांचा धक्कादायक दावा

Sonam Raghuvanshi : बहुचर्चित अशा राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनम रघुवंशी(Sonam Raghuvanshi)ला अटक करण्यात आली आहे. सोनम रघुवंशी(Sonam Raghuvanshi)ला सोमवार, ०९ जूनला उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातून अटक केली आहे.

94

Sonam Raghuvanshi : बहुचर्चित अशा राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनम रघुवंशी(Sonam Raghuvanshi)ला अटक करण्यात आली आहे. सोनम रघुवंशी(Sonam Raghuvanshi)ला सोमवार, ०९ जूनला उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. दरम्यान, मेघालयातील शिलाँग येथे राजा रघुवंशी याची हनीमून दरम्यान हत्या करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.(Sonam Raghuvanshi)

(हेही वाचा “माझी मुलगी राजाचा जीव घेऊच शकत नाही…”; ‘Sonam Raghuvanshi’च्या वडिलांचा धक्कादायक दावा )

इंदूर येथील नवविवाहित जोडपं हनिमूनकरिता मेघालयातील शिलाँग येथे गेलं होतं. राजा रघुवंशीचा मृतदेह मागील दोन-तीन दिवसांपूर्वीच आढळला होता. तसेच, त्याची पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता राजाचा मृतदेह सापडल्यानंतर तब्बल सात दिवसांनी सोनम(Sonam Raghuvanshi)ने कुटुंबियांशी संवाद साधल्याचे समोर आले.

महत्त्वाचे म्हणजे पोलीस तपासानंतर राजा रघुवंशी याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या प्रकरणात सोनम रघुवंशी, तिचा कथित बॉयफ्रेंड आणि दोन सुपारी किलर्सना अटक करण्यात आली आहे. तपासातून खळबळजनक माहिती समोर येत असताना सोनमच्या कुटुंबाने मात्र तिच्या निर्दोषतेचा दावा करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सोनमचे वडील नेमकं काय म्हणाले?

सोनम रघुवंशीचे(Sonam Raghuvanshi) वडील देवी सिंह म्हणाले, माझी मुलगी अशा कृत्यात सहभागी होऊच शकत नाही. तिला बनावट कटात अडकविण्यात आले आहे. मेघालय पोलिसांना खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात अपयश आल्याने सोनमला बळीचा बकरा बनविले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सोनमच्या वडिलांनी केली. तसेच, जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असेही देवी सिंह म्हणाले.(Sonam Raghuvanshi)

 

तर दुसरीकडे, राजा रघुवंशी यांच्या आई उमा यांनी सोनमवर गंभीर आरोप केले आहेत. सोनमने राजाला न सांगता विमानाचे तिकीट बुक केले होते. तिच्या बोलण्यात गोडवा होता, त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. ती राजाला  शिलॉन्गला घेऊन गेली. हा सगळा कट आधीच ठरलेला होता, असेही त्यांनी सांगितले. तसेच, राजाच्या मृत्यूने आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. जर सोनम दोषी असेल, तर तिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.