Sion Hospital : डॉ. डेरेवर गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब का झाला? पोलिसांनी सांगितले कारण..

353
Sion Hospital : डॉ. डेरेवर गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब का झाला? पोलिसांनी सांगितले कारण..
Sion Hospital : डॉ. डेरेवर गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब का झाला? पोलिसांनी सांगितले कारण..
न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ.राजेश डेरे (Dr. Rajesh Dere) यांच्या मोटारी खाली आल्याने एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री  सायन रुग्णालयाच्या (Sion Hospital) आवारात घडली.सायन पोलिसांनी  या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लावल्यामुळे शनिवारी दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. डॉ. राजेश डेरे (Dr. Rajesh Dere) हे सायन रुग्णालयातील (Sion Hospital) न्यायवैधक विभागाचे प्रमुख अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता का?असा प्रश्न अनेकांना पडले होते. परंतु  या घटनेची सत्य परिस्थिती दडवून  पोलिसांना खोटी देण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला असल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली. शनिवारी रात्री सायन पोलिसांनी डॉ. डेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Sion Hospital)
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे राहणाऱ्या होत्या.हाताला झालेल्या जखमेला मलमपट्टी करण्यासाठी सायन रुग्णालयात येणाऱ्या रुबेदा शेख (६०) यांचा शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सायन रुग्णालयाच्या (Sion Hospital) आवारात गेट क्रमांक ७ जवळील ओपीडी जवळ मोटारीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ज्या मोटारीच्या धडकेत ही रुबेदा शेख (Rubeda Shaikh) ही जखमी होऊन मृत झाली ती मोटार सायन रुग्णालयाचे (Sion Hospital) न्यायवैधक विभागाचे (शवविच्छेदन) प्रमुख डॉ.राजेश डेरे (Dr. Rajesh Dere) यांची होती.शुक्रवारी झालेल्या अपघाता प्रकरणी सायन पोलिसांनी तब्बल २४ तासाने डेरे यांच्यावर  गुन्हा दाखल केला. उशिरा दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे अनेकाना प्रश्न पडला होता. (Sion Hospital)
परंतु रुग्णालयाकडून आलेल्या संदेश आणि डॉक्टर डेरे यांनी लपवलेल्या सत्य घटनेमुळे पोलिसांना या अपघाताचे पुरावे शोधून तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासल्या नंतर रुबेदा शेख (Rubeda Shaikh) चा अपघातात मृत्यु झाल्याचे उघडकीस आले. या सर्व पुराव्या व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शनिवारी रात्री डॉ. राजेश डेरे (Dr. Rajesh Dere) यांच्या विरुद्ध भारतीय दंड कलम ३०४ (अ) (निष्काळजीपणे, हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत होणे), ३३८ ( निष्काळजीपणे मानवी जीवन धोक्यात आणणे),२७९ ( निष्काळजीपणे वाहन चालवणे)२०३ (खोटी माहिती देणे) १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री डॉ. डेरे यांना सायन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अपघाता संदर्भात चौकशी करण्यात येत होती.  (Sion Hospital)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.