परळी वैजनाथ शहरातील स्नेहनगर भागात मोकळ्या जागेत असलेल्या गाईंना (Cow) डांबून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा खळबळजनक प्रकार 25 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर उघडकीस आला. हा प्रकार साधारण दोन वाजण्याच्या सुमारास घडला असून या गाईंना (Cow) गुंगीच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान याप्रकरणी आता स्नेहनगरमधील नागरिक संतप्त झाले असून संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाई करून कडक शासन करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.
(हेही वाचा Pakistan : पाकिस्तान्यांशी ‘गोतावळा’ वाढवून भारतात राहणाऱ्या मुसलमान महिलांची झाली गोची)
परळी शहरातील स्नेहनगर या भागात मध्यरात्री दोन वाजल्यानंतर एक झायलो गाडी या भागात फिरत असताना दिसून आली. मोकळ्या मैदानात काही लोक या गाडीतून उतरले. त्यांनी चार गाईंना (Cow) गुंगीच्या गोळ्या खाऊ घातल्याचे पुढे आले आहे. गुंगी येऊन या गाई खाली जमिनीवर कोसळल्यानंतर या गाई या ‘झायलो’ गाडीत डांबून टाकत असताना याच भागातील एका महिलेच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर काही लोक जमा होत असल्याचे दिसताच या गाडीतून उतरलेल्या लोकांनी तिथून पळ काढला. यानंतर स्नेहनगरमधील शेकडो नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले. गोवंश व गोमातेचे (Cow) अशा पद्धतीने अमानुषरित्या गुंगीच्या गोळ्या देणे व तस्करीच्या उद्देशाने त्यांना घेऊन जाणे हा चीड आणि संताप आणणारा प्रकार असल्याचे या नागरिकांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. दरम्यान पोलीस याबाबत सखोल तपास करत असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचीही माहिती आहे.
Join Our WhatsApp Community