Sharmishtha Panoli : हायकोर्टाचा जामीनास नकार, पण प्रकरणात नवा ट्विस्ट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट काय?

Sharmishtha Panoli : कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)ला कोलकाता उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारला आहे. उच्च न्यायालयाने अंतरिम जामीनास नकार देतानाच गार्डनरीच पोलीस स्टेशनला शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)च्या अटकेची केस डायरी दि. ०५ जूनला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

96

Sharmishtha Panoli : कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)ला कोलकाता उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारला आहे. उच्च न्यायालयाने अंतरिम जामीनास नकार देतानाच गार्डन रिच पोलीस स्टेशनला शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)च्या अटकेची केस डायरी दि. ०५ जूनला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, भारतासारख्या विविध देशात धार्मिक भावना दुखावण्याच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संवैधानिक मर्यादा आहेत, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.(Sharmishtha Panoli)

(हेही वाचा ‘४८ तास लढू इच्छिणाऱ्या पाकिस्तानची अवघ्या ८ तासांत शरणागती’; CDS जनरल अनिल चौहान यांचं विधान )

शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli) प्रकरणी केस डायरी सादर करताना अंतरिम जामीनावर सुनावणी होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पार्थ सारथी मुखर्जी यांच्या खंडपीठाने या प्रकरणात म्हटले की, गार्डन रिच पोलिस स्टेशनमध्ये ज्या प्रकरणात शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)ला अटक केली आहे, त्याची चौकशी केली जाईल. तसेच, या संदर्भात नोंदविलेल्या इतर सर्व एफआयआरमधील कारवाई पुढील आदेशापर्यंत स्थगित राहील असे सांगतानाच बंगाल सरकारने शर्मिष्ठा(Sharmishtha Panoli)च्या कथित कृतीबाबत कोणताही नवीन खटला नोंदवू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने यावेळी दिले.

शर्मिष्ठा पानोलीविरोधात तक्रार करणारा वजाहत खान बेपत्ता!

सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आता ज्या वजाहत खानने तिच्याविरोधात तक्रार केली होती, तोच बेपत्ता असल्याचा दावा तक्रारदार खानच्या वडिलांनी केला. गेल्या रविवारपासून तो बेपत्ता असून शर्मिष्ठाला अटक झाल्यापासून कुटुंबाला धमकीचे फोन येत असल्याचेही त्यांनी म्हटले.

एफआयआर दाखल करणारा अनेक प्रकरणांत आरोपी

विशेष म्हणजे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल शर्मिष्ठा पानोली(Sharmishtha Panoli)विरुद्ध कोलकात्याच्या गार्डन रिच पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करणारे वजाहत खान कादरी रशिदी हा स्वतः अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचे समोर आले आहे. कोलकाता व्यतिरिक्त, दिल्ली आणि गुवाहाटीमध्येही त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

तसेच, या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असून तथ्यांची पुष्टी झाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. इंटरनेट मीडियावर जातीय आणि प्रक्षोभक पोस्ट पोस्ट केल्याबद्दल कोलकाता पोलिसांच्या सायबर सेल आणि शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये कादरी यांच्याविरुद्ध किमान सात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं ट्विट

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर म्हटले की, माँ कामाख्या देवीविरुद्ध एका व्यक्तीने केलेल्या अस्वीकार्ह टिप्पणीसंदर्भात आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यक्तीला राज्यात कायदेशीर कारवाईसाठी आणण्याकरिता बंगाल सरकारचे सहकार्य घेऊ, असे त्यांनी म्हटले.(Sharmishtha Panoli)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.