पतीने घेतलेल्या कर्जापोटी गृहिणीवर लैंगिक अत्याचार; सावकाराला अटक

130
पतीने घेतलेल्या कर्जापोटी गृहिणीवर लैंगिक अत्याचार; सावकाराला अटक
पतीने घेतलेल्या कर्जापोटी गृहिणीवर लैंगिक अत्याचार; सावकाराला अटक

पतीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एका सावकाराकडून एका गृहिणीवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना दादर परिसरात समोर आली आहे. या सावकाराकडून अत्याचाराचा व्हिडीओ तयार करून तो व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडित गृहिणीने केला आहे. या घटनेनंतर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावकाराला अटक केली आहे.

गिरीश वरळीकर (४४) असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. कोरोनामुळे पीडित गृहिणीच्या पतीने २०२१ मध्ये गिरीश वरळीकर या सावकाराकडून ३ टक्के व्याजाने ५ लाख रुपयाने कर्ज घेतले होते. पीडित गृहिणीचा पती सावकाराला दरमहा १५ हजार रुपये देऊन कर्जाची परतफेड करीत होता, मात्र व्याजामुळे कर्जाच्या रक्कमेची परतफेड होऊ शकत नसल्यामुळे सावकाराने पीडित महिलेला फोन केला, व वांद्रे येथे एका व्यावसायिकाकडून कमी व्याज दराने १२ लाख रुपयांचे बकर्ज मिळवून देतो असे सांगून तीला एकटीला वांद्रे येथे भेटायला बोलावले, तेथून त्याने तीला खोटं सांगून खार येथील एका हॉटेलवर आणून हॉटेलच्या खोलीत तीच्यावर लैंगिंक अत्याचार केला, व या अत्याचाराचा व्हिडीओ मोबाईल मध्ये कैद केला.

(हेही वाचा – इर्शाळवाडी दरड दुर्घटना : मदतीसाठी सरसावले लालबाग गणेशोत्सव मंडळ)

त्यानंतर सावकाराने अत्याचाराचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मागील दोन वर्षांपासून तो तीच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता अशी माहिती पीडितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मागील दोन वर्षांच्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पतीला विश्वासात घेऊन पीडितेने दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावकार गिरिष वरळीकर याला अटक केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.