Senior Citizen : नोकरांकडून जेष्ठ नागरिकांच्या हत्या; पंधरा दिवसात मालाडनंतर सांताक्रूझमध्ये दुसरी हत्या

मालाड आणि सांताक्रूझ या ठिकाणी घडलेल्या दोन्ही घटनांमधील नोकरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

111
नोकरांकडून जेष्ठ नागरिकांच्या हत्या
नोकरांकडून जेष्ठ नागरिकांच्या हत्या

जेष्ठ नागरिकांची देखरेखीसाठी ठेवण्यात येणाऱ्या नोकरांकडून जेष्ठ नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे, मागील पंधरा दिवसात मुंबईत दोन जेष्ठ नागरिकांची नोकरांनी हत्या करून घरातील सोनं नाणं लुटल्याचा घटना घडल्यामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मालाड आणि सांताक्रूझ या ठिकाणी घडलेल्या दोन्ही घटनांमधील नोकरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मालाड पश्चिम ओरलेम चर्च या ठिकाणी राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेची २२ एप्रिल रोजी मोलकरीणने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या करून घरातील वस्तू लुटून पोबारा केला होता, या घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोच ७ मे रोजी सांताक्रूझ पश्चिम सेंट्रल अव्हेनू, हेलेना इमारत येथे राहणारे ८६ वर्षीय डॉ.मुरलीधर पुरुषोत्तम नाईक यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. डॉ. मुरलीधर यांची हत्या त्यांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या कृष्णा परिहार (३०) या  नोकराने केल्याचे उघडकीस आले. हत्येनंतर त्याने डॉ. मुरलीधर यांच्या अंगावरील दागिने, घड्याळ चोरी करून पोबारा केला होता.

(हेही वाचा Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरील ‘त्या’ घटनेचा एमएसआरडीसीकडून खुलासा)

डॉ. मुरलीधर आणि पत्नी उमा नाईक (८०) हे एकत्र राहत होते,त्यांची मुले मुंबईतच दुसरीकडे राहण्यास आहे. डॉ. मुरलीधर यांची देखरेख करण्यासाठी हेल्थ केअर एट होम इंडिया प्रा.ली यांच्याकडून केअरटेकर ठेवण्यात आला होता, तो केअर टेकर सुट्टीवर गेल्यामुळे या कंपनीने तात्पुरता कृष्णा परिहार याला कामासाठी पाठवले होते.डॉ.मुरलीधर आणि नोकर कृष्णा हे एका खोलीत तर पत्नी उमा नाईक दुसऱ्या बेडरूममध्ये  झोपत असे. ७ मे रोजी रात्री कृष्णा याने डॉ. मुरलीधर यांचे हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी चिटकवून गळा आवळून हत्या केली, व दागिने चोरी करून पसार झाला होता, सुदैवाने उमा नाईक दुसऱ्या बेडरूम मध्ये होत्या त्यांनी आतून कडी लावल्यामुळे त्या बचावल्या. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी हत्या आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असतांना नोकर कृष्णा परिहार याला अटक करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.