ATS Police Action : पोलीस कारवाईच्या भीतीने पाचव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यु

अन्सारी मोहम्मद आझम अख्तर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव होते. अन्सारी हा भिवंडी येथील गौरी पाडा परिसरात राहत होता.

180
ATS Police Action : पोलीस कारवाईच्या भीतीने पाचव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यु

बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एटीएस अधिकारी (ATS Police Action) यांना बघून पळून जाण्याचा प्रयत्नांत असणाऱ्या ३४वर्षीय इसमाचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यु झाला आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Call Centre : पहाटेचा नाश्ता पडला भारी; बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश)

अन्सारी मोहम्मद आझम अख्तर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव होते. अन्सारी हा भिवंडी येथील गौरी पाडा परिसरात राहत होता. त्याच परिसरातील अझान रेसिडेन्सीमधील एका अपार्टमेंटमध्ये अन्सारी हा बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला (ATS Police Action) मिळाली होती. या इमारतीत सुरू असणाऱ्या बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजची खात्री करण्यासाठी ठाणे एटीएसचे पथक भिवंडी येथे शनिवारी दाखल झाले होते. एटीएसचे अधिकारी आझाद रेसिडेन्सीमध्ये असणाऱ्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आले व त्यांनी अन्सारी ज्या खोलीत बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवत होता त्या घराचे दार ठोठावले.

हेही पहा – 

एटीएसचे अधिकारी (ATS Police Action) आल्याचे बघून अन्सारी याने पाचव्या मजल्यावरील खिडकीतून टेलिफोन नेटवर्क चालवण्यासाठी वापरलेली उपकरणे फेकून दिली आणि इमारतीच्या बाहेरील पाईपाच्या आधारे खाली उतरत असतांना त्याचा हात निसटला आणि तो पाचव्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. अन्सारी याला तातडीने भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळताच भोईवाडा पोलिसांनी (ATS Police Action) आयजीएम रुग्णालयात धाव घेतली, तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून अपमृत्यूची नोंद केली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला अन्सारी मोहम्मद आझम अख्तर याने भिवंडीतील गौरी पाडा परिसरातील अझान रेसिडेन्सीमधील एका अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवल्याची माहिती मिळाली होती, अन्सारी हा बेकायदेशीरपणे टेलिफोन कॉल्स री-राउट करत होता आणि आमचे पथक शनिवारी सायंकाळी माहिती घेण्यासाठी गेले असता त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला असताअन्सारी याचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यु झाला असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने (ATS Police Action) सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.