पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये एका शाळेच्या बस(School Bus Terror Attack)वर आत्मघातकी कार बॉम्बचा हल्ला करण्यात आला आहे. या बॉम्ब हल्ल्यात चार मुले ठार झाली असून ३८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांकडून आत्मघातकी बॉम्बरचा वापर करून शाळेच्या बसला लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(School Bus Terror Attack)
(हेही वाचा Uttar Pradesh मधील विद्यापीठात बनावट पदव्यांचा गोरखधंदा, ‘४-४ लाखांत…’; एसटीएफच्या तपासात धक्कादायक माहिती समोर )
दरम्यान, बलुचिस्तानमधील खुजदार येथे झालेल्या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाला असून अधिकृत माहितीनुसार, एका आत्मघातकी कार बॉम्बरने शाळेच्या बस(School Bus Terror Attack)ला लक्ष्य केले. या घटनेनंतर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी भाष्य केले आहे. पाकिस्तान सरकारचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉननुसार, प्रत्यक्ष घटनेच्या वेळी शाळेची बस झिरो पॉइंटजवळ होती. स्फोटानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर स्फोटात गंभीर जखमींना क्वेटा आणि कराची येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना म्हणाले, मुलांना लक्ष्य करणाऱ्या हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.(School Bus Terror Attack)
Join Our WhatsApp Community