Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; २५ कोटींची मागणी केल्याची एफआयआरमध्ये नोंद

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्स प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर अधिकारी आणि दोन खाजगी इसम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

116

एनसीबीचे  माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होत असताना दिसून येत आहे. सीबीआयने दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवाल (एफआयआर ) मध्ये २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कॉर्डीयल क्रूज प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आर्यन खान ला सोडण्यासाठी २५ कोटीची रक्कम मागण्यात आली होती, त्यापैकी ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यात आल्याप्रकरणी सीबीआयने एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे सह पाच जणांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७अ आणि१२ तसेच भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी ) कलम १२० ब (गुन्हेगारी कट) आणि ३८८ (धमकीने खंडणी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांच्या घरी छापेमारी नंतर सीबीआयने वानखेडे यांना चौकशीकामी हजर राहण्यासाठी समन्स जारी केल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्स प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर अधिकारी आणि दोन खाजगी इसम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर मध्ये समीर वानखेडे  यांच्यावर भ्रष्ट्राचार, खंडणीचा आरोप लावण्यात आला आहे, या एफआयआर मध्ये सीबीआयने केलेल्या खुलाशात खाजगी इसम के.पी गोसावी  याने आर्यन खानच्या कुटुंबियांकडून २५ कोटी खंडणी उकलण्याची योजना आखली होती असे एफआयआर मध्ये सीबीआयने म्हटले आहे, २५ कोटीवरून १८ कोटीवर तडजोड झाल्यानंतर ५० लाख रुपये पहिला हप्ता केपी गोसावी आणि  सॅनव्हिले डिसोझा यांनी स्वीकारली होती असेही एफआयआर मध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा The Kerala Story : ‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होईल या भीतीने ‘द केरळ स्टोरी’ला विरोध)

हे प्रकरण पुढे आल्यानंतर एनसीबीच्या यांचे एक एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी सुरु होती, एसआयटीच्या चौकशीत असे समोर आले आहे की, क्रूझ प्रकरणातील साक्षीदार यांनी आरोपीना खाजगी वाहनातून एनसीबीच्या कार्यालयांत आणले होते, त्यातील एक साक्षीदार केपी गोसावी हा जाणूनबुजून आरोपीला घेऊन मीडियाच्या कॅमेरासमोर येत होता, जेणेकरून तो एनसीबीचा कर्मचारी वाटावा म्हणून तो असे करीत होता, साक्षीदार केपी गोसावी याला आरोपीं सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती आणि छाप्यानंतर एनसीबी कार्यालयात येण्याची परवानगी देखील देण्यात आली होती  जी एनसीबीच्या नियमांच्या विरुद्ध होती असे एसआयटीच्या चौकशीत समोर आले असल्याचे एफआयआर मध्ये म्हटले आहे, के.पी.गोसावी याने कथित आरोपी सोबत सेल्फी काढून  आरोपीचा व्हॉईस रेकॉर्ड  केला होता, यातूनच के.पी. गोसावी आणि त्यांचे सहकारी सॅनव्हिले डिसोझा यांना खंडणीचा कट रचला होता असे एफआयआय मध्ये म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.